मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण असल्याचं वृत्त आहे. इथं गेल्या १२ तासांपासून सुमारे ३०० हून अधिक प्रवाशी अडकून पडले आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचं उड्डाण होऊ न शकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. (Over 300 Passengers Stranded For More Than 12 Hrs at Mumbai Airport Massive Chaos Continues)
टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. व्हिएतनामच्या Viet Jet कंपनीच्या विमानात हा बिघाड झाला असून हे विमान मुंबईहून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराकडं निघालं होतं. एका प्रवाशानं आरोप केला आहे की, विमानाच्या उड्डाणाला मोठा कालावधीसाठी उशीर होणार असतानाही एअरलाईननं आमच्या राहण्याखाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. डीजीसीएच्या नियमानुसार, जर विमानाला उशीर होणार असेल तर एअरलाईननं प्रवाशांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करणं बंधनकारक आहे. (Mumabi Airport News)
एअरलाईननं प्रसिद्ध केलं निवेदन
दरम्यान, मुंबई ते हो ची मिन्ह साठी जाणारं विमान रात्री १ वाजता उड्डाण करणार होतं. पण विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यानं या विमानाचं उड्डाण २०.३० वाजता अर्थात दुसऱ्या दिवशी रात्री साडे आठ वाजता रिशेड्युल करण्यात आलं. विमानाच्या रिशेड्युलिंगमुळं इतरही काही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यामुळं एअरलाईनच्या पॉलिसीनुसार, प्रवाशांना पुरवण्यात येणारे हॉटेल, जेवण, पेय आणि इतर सर्व आवश्यक गोष्टी पुरवण्यावरही परिणाम झाला आहे, असं Viet Jet नं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.