डोंबिवली - गणवेश न परिधान करता तो रिक्षा चालवत होता. यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याचे पितळ उघड पडले. डोंबिवली रामनगर परिसरात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना रिक्षा चालकाकडे केलेल्या चौकशीत सदर रिक्षा ही बदलापूर येथून चोरी केलेली असल्याची बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी रिक्षासह राजेंद्र अजिनाथ जाधव (वय 42) या चोरट्याला बदलापूर पोलिसांच्या हवाली केले आहे.