सॅनिटायझरचा अतिवापर आहे प्रचंड हानिकारक, वाचा सॅनिटायझरच्या अतिवापराचे तोटे

सॅनिटायझरचा अतिवापर आहे प्रचंड हानिकारक, वाचा सॅनिटायझरच्या अतिवापराचे तोटे
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूच्या भितीने स्वच्छतेचा अतिरेक सुरु झाली असून सॅनिटायझराच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, हा अतिरेकी वापरही हातांसाठी घातक ठरू शकतो. वारंवार सॅनिटायझर वापरल्याने हातावरील त्वचेला हानी पोहचून बाहेरील विषाणू, जिवाणू रोखून धरण्याची क्षमता कमी होऊ शकते. हाताची आणि शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमताही कमी होऊ शकते.असा दावा केला जात आहे.

राज्याच्या आरोग्य विभागा मार्फत तसेच महापालिके मार्फतही साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, मुंबई सारख्या शहरात सॅनिटायझरचा वापर वाढू लागला आहे. खासकरुन लहान मुलांना सॅनिटायझर वापरायला देण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अल्कहोलचे प्रमाण असलेले सॅनिटायझर हातासाठी घातक ठरू शकतात असे कॉस्मेटिक सर्जरी इंन्स्टीट्यूटचे डॉ.मोहन थॉमस यांनी सांगितले. महानगर पालिकेने जनजागृतीसाठी केलेल्या जाहीरातीमध्ये सॅनिटायझर वापरण्याचा उल्लेख नाही असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर यांनीही साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला. किमान 20 सेंकद साबणाने हात धुणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. सॅनिटायझरच्या अतिरेकी वापरावामुळे हातावरील त्वेचाला हानी पोहचते. वातावरणातील जिवाणू, विषाणू रोखून धरण्याची या त्वचेची नैसर्गिक क्षमता असते. मात्र, या त्वचेला हानी पोहचल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात असा दावा त्वचाविकार तज्ज्ञ करत आहेत. 

सॅनिटायझरचा वापरामुळे हातांची आणि शरीरांची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. लहान मुलं आणि वयोवृध्दांना यांचा जास्त त्रास होण्याची शक्‍यता आहे. लहान मुलांची त्वचा नाजूक करते.त्यामुळे त्यांच्यावर सॅनिटायझरचा अतिरेकी वापर अधिक घातक ठरू शकतो. 

"कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असू शकतो.त्यामुळे सॅनिटायझर बरोबर साबणाचाही अतिरेकी वापर योग्य नाही. पर्याय नसेल तेव्हा सॅनिटायझर वापरावे.- डॉ.पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगर पालिका 

सॅनिटायझरच्या अतिरेकी वापराचा परीणाम 

- हातावरील त्वचेला हानी पोहचते. 
- हातावरील त्वचा कायमस्वरुपी कोरडी पडून भेगा पडू शकतात. 
- सनबर्न होऊ शकतो. 
- ऍलर्जी होऊ शकते. 

overs use of sanitizers is very harmful read full report sideeffects of sanitizers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.