कासा : कडक उन्हामुळे बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत; ग्राहकांची मोठी मागणी

filtered water
filtered water sakal Media
Updated on

कासा : डहाणू तालुक्यातील (Dahanu) ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये सुद्धा या उन्हाळाच्या दिवसात (Summer day) बाटलीबंद पाण्याला (Mineral water) ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता मोठया प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी (Packaged drinking water)) वाढली आहे. परिणामी, हा व्यवसाय खूप तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या (Filter water) नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांकडून सुरू आहे.

filtered water
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; 10 लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

पाणी शुद्ध केले जाते की नाही, पण लवकर बक्कळ पैसा कमावण्याच्या बाटलीबंद हव्यासापोटी परंतु अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे. पाण्याच्या बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपनीचे पाणी मिनरल असते. तर, काही कंपन्या पॅकेजच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत. सद्या पाणपोईची संख्या घटली आहे, पूर्वी रस्त्यावर सेवाभावी संस्था उन्हाळ्यात पाणपोई द्वारे पाणी वाटप करीत होत्या.

आता ही स्थिती बदलली आहे. त्यात पाणपोई अथवा नळावर, विहरीचे पाणी पिणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. सर्वांना सहज बाटलीबंद पाण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. असल्याने आता बाटलीबंद पाणी विकत घेणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. उपहार गृहामध्ये साधे पाणी पिणेही टाळण्यात येत बिसलेरी चा वापर सर्रास केला जात आहे .

filtered water
भिवंडी : इमारत कोसळून महिलेचा मृत्यू; दोघे जण गंभीर जखमी

काही व्यावसायिक वापरलेल्याच व बाटल्या मध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात .अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत असतात. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात वाढला आहे. पाण्याची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे म्हणून ग्राहक ते विकत घेतात.

यातून ग्राहकांची लूट होत असून त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता एक लिटर पाण्याची बाटली जवळपास वीस रुपयांना मिळते. अनेक हॉटेलचालक स्वतः च्या पाण्याच्या बाटल्या विकत आहेत. त्यात अनेक शीतपेय निर्मिती कंपन्या ही बाटलीबंद पाण्याची विक्री करताना दिसत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने पॅक बंद,


कालावधी, स्वच्छता, मुदत यावर लक्ष दिले पाहिजे. मात्र, अनेक कंपन्या पाण्याच्या बाटलीवर असा उल्लेख करीत नाही. ; अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही अशा पद्धतीने लिहलेले असते.बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर एखाद्या दिवशी अशुद्ध पाणी पिण्यामुळे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होईल. काही दिवसानी महालक्ष्मी ची यात्रा सुरु होणार आहे या यात्रेत लाखो लिटर बाटली बंद पाणी पुरविले जाणार आहे. यात मोठी उलाढाल होणार आहे.यात अनेक पाणी व्यापारी पाण्याचा मोठा धंदा करणार आहेत.

"सद्या बहुतेक नागरिक पिण्यासाठी पाणी म्हणून मोठया बाटल्या पाण्याच्या मागवत आहेत.३०रु बॉटल, थंड पाहिजे असेल तर ४०रु प्रमाणे मिळत आहेत. ग्रामीण भागात कोणी हे पाणी कुठुन आणले कसे आहे हे न पाहता घेत आहेत.लग्न समारंभात तर सगळेच जण या पाण्याचा वापर करीत आहेत."

आशिष चव्हाण -कासा. नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.