Paduka Darshan Sohala 2024 : पादुका दर्शन कधी, कुठे आणि नोंदणी कशी करता येईल?

श्री फॅमिली गाईड हा उपक्रम काय आहे आणि पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्याचे कारण काय?
Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 Sakal
Updated on

संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव ही भारताची जगभरातील अनोखी ओळख ठरली आहे. त्यासाठी अनेक महानुभावांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Q

श्री फॅमिली गाईड हा उपक्रम काय आहे आणि पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्याचे कारण काय?

अध्यात्माची ही समृद्ध परंपरा आपल्या आध्यात्मिक गुरूंनी रुजवली, जोपासली आणि पुढे नेली. त्याच मार्गावर वाटचाल सुकर व्हावी म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ‘श्री फॅमिली गाईड उपक्रम सुरू केला आहे.

त्या अंतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘श्रीगुरू पादुका उत्सवा’च्या माध्यमातून आध्यात्मिक मार्गाची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस शांतता शोधत असतो. वाढत्या स्पर्धेच्या या जगात समाधानाचे क्षण कोठे दिसतात का, हे तो पाहत असतो; पण आपल्या गुरू आणि संतांनी शेकडो वर्षांपासून सांगितलेला आध्यात्मिक मार्गच याची अनुभूती देतो आणि तोच शाश्‍वत आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा इच्छा असूनही प्रत्येक तीर्थस्थानाला भेट देणे शक्य होत नाही; पण हीच संधी ‘श्री फॅमिली गाईड’ने समस्त जनतेला ‘संकल्प ते सिद्धी सोहळ्या’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

Q

सोहळ्यातील १८ पादुका कोणाच्या आहेत?

अध्यात्माच्या क्षेत्रातील ज्यांच्याकडे आपण श्रद्धेने जातो, अशा महाराष्ट्रातील १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी यानिमित्त उपलब्ध झाली आहे. एकाच छताखाली साधकांना आपल्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची अपूर्व संधी या निमित्ताने मिळणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर), श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य - श्री एम), श्री रामदास स्वामी (सज्जनगड), श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री टेंबे स्वामी महाराज (माणगाव), श्री गजानन महाराज (शेगांव), परमसद्‌गुरू गजानन महाराज (शिवपुरी), संत वेणाबाई (मिरज), श्री शंकर महाराज (धनकवडी), श्री गुळवणी महाराज (पुणे) आणि श्रीगुरू बालाजी तांबे (कार्ला) यांच्या पादुकांचा आशीर्वाद सोहळ्यात घेता येणार आहे.

Q

पादुका दर्शन सोहळ्याची तारीख काय?

२६ आणि २७ मार्च २०२४ रोजी दोनदिवसीय पादुका दर्शन उत्सव होत आहे.

Q

पादुका दर्शन सोहळ्याचे ठिकाण आणि वेळ काय?

Summary

नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पादुका दर्शन सोहळा पार पडणार आहे. सकाळी १०. ३० ते रात्री ९.३० या वेळेत पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

Q

शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रम कधी आहे?

संगीत हा अध्यात्माचा अविभाज्य घटक आहे; त्यामुळे गुरू पादुका उत्सवांतर्गत भजन, कीर्तनासह संगीत समारंभही होणार आहे. सुविख्यात गायक हरिहरन आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांचा संगीत सोहळा रंगणार आहे. २६ मार्च रोजी रात्री ८.३० ते १० या वेळेत प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा तर २७ मार्च रोजी रात्री ८.३० ते १० या वेळेत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे आपल्या सुरांच्या जादूने भाविकांना मंत्रमुग्ध करतील.

Q

सोहळ्याचे वैशिष्ट्य काय?

श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने होत असलेल्या या पादुका दर्शन सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. योग, सामूहिक ध्यान, दीपध्यानासह सूर्योदय आणि सूर्यास्तसमयी सुमारे पाच हजार भाविक एकाच वेळी अग्निहोत्राचा विधी करणार आहेत. डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले अग्निहोत्रासाठी मार्गदर्शन करणार आहेत. 

Q

पादुका दर्शन सोहळ्याबाबत भक्तांच्या भावना काय आहेत?

‘मानवी समाजाचे जीवन संपन्न आणि समृद्ध करणारा हा आध्यात्मिक सोहळा संस्मरणीय ठरणार आहे. ‘सकाळ’चा उपक्रम मनःशांती आणि आदर्श जीवनशैलीचा राजमार्ग आहे. पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने एक आध्यात्मिक चळवळ सुरू होत आहे. हा सोहळा आनंदाची आणि समाधानाची गुरुकिल्ली ठरेल; तसेच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवेल,’ अशी भावना राज्यभरातील विविध देवस्थानांचे प्रमुख व्यक्त करीत आहेत. तमाम भक्तांसाठी ही अनोखी पर्वणी असल्याचे मत विविध मंदिरे आणि मठांच्या विश्वस्तांनी मांडले. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या भक्तीच्या उपक्रमास सर्वच स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत. सोहळ्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून, समस्त वारकरी संप्रदायातर्फे कार्यक्रम स्थळी दिंडी आणि रिंगण सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत आहे.

Q

पादुका दर्शन सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका काय आहे?

२६ मार्च २०२४

सकाळी १०.३० ते रात्री ९.३० : पादुका दर्शन

सायं. ६.१० ते ६.१५ प्रस्तावना

सायं. ६.१५ ते ६.४०   ओंकार जप सुनील तांबे

सायं. ६.५१ ते ७.०० अग्निहोत्र डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

सायं. ७.०० ते ७.०५ धुनी प्रज्वलन

सायं. ७.१५ ते ७.२५ मार्गदर्शन अभिजित पवार

सायं. ७.२५ ते ७.३५   मार्गदर्शन डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

सायं. ७.३५ ते रात्री ८.१५   व्याख्यान श्री एम

रात्री ८.३० ते १० प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रम

२७ मार्च २०२४

सकाळी १०.३० ते रात्री ९.३० :  पादुका दर्शन

सायं. ६.१० ते ६.१५ प्रस्तावना

सायं. ६.१५ ते ६.४० ओंकार जप    सुनील तांबे

सायं. ६.५१ ते ७ .०० अग्निहोत्र डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

सायं. ७.१५ ते ७.२५   मार्गदर्शन अभिजित पवार

सायं. ७.२५ ते ७.३५   मार्गदर्शन डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

सायं. ७.३५ ते रात्री ८.१५   व्याख्यान श्री एम

रात्री ८.३० ते १०  

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.