Paduka Darshan Sohala 2024 : भाविकांसाठी होणार श्रद्धेचे महाद्वार खुले ; सहकुटुंब सहभागाचा संकल्प

संतपरंपरेने आपल्याला माणुसकीची शिकवण दिली. हाच माणुसकीचा धर्म समाजाला जोडण्याचे काम करत असून ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ या उपक्रमातून भाविकांना श्रद्धेचे महाद्वार खुले करून देण्यात आले आहे.
Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024sakal
Updated on

पुणे : संतपरंपरेने आपल्याला माणुसकीची शिकवण दिली. हाच माणुसकीचा धर्म समाजाला जोडण्याचे काम करत असून ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ या उपक्रमातून भाविकांना श्रद्धेचे महाद्वार खुले करून देण्यात आले आहे. एकाच वेळी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा दुग्धशर्करा योग भाविकांना आयुष्यात पहिल्यांदाच मिळणार आहे. त्यामुळे लाखो भाविकांना आयुष्य सत्कारणी लागल्याची अनुभूती मिळणार असल्याची भावना विविध क्षेत्रांतील नागरिकांनी व्यक्त केली.

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता.२७) नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ आयोजित केला आहे. यात १८ संत व सद्‌गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येईल. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा उत्सव होईल. यानिमित्त आयोजित बैठकीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उत्सवात सहकुटुंब सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. बैठकीला विविध क्षेत्रांतील महिलांचाही सहभाग होता. या वेळी श्रीरामजी संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, श्री तिरुपती बालाजी सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ भुजबळ, माधव तारके, विजयराज मुंदडा, प्रशांत गांधी, स्वाती लोढा, अर्चना चांडक, भाऊसाहेब करपे, संजय राठी, विजयराज मुंदडा, राहुल इंदानी, पंकज मांढरे, प्रमोद मालपाणी, प्रवीण भोसले, गोविंद उफाड, चंद्रकांत घाणेकर, वैभव शृंगारपुरे, आनंद चांडक, प्रकाश चांडक, रमेश मोरे, धैर्य दिनेश ठक्कर आदी उपस्थित होते.

प्रमुख प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया अशा :

राजेंद्र शरद तांबेकर (आंबेकर) अध्यक्ष, जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट : आबालवृद्धांना मार्गदर्शक ठरणारा श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव अतिशय सुंदर उपक्रम आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत हा उपक्रम पोहचत आहे. या उपक्रमातून अध्यात्माबद्दलही शिकायला मिळत आहे. यातून समाजात होणारी जागरूकता महत्त्वाची आहे. वीरेंद्र किराड (अध्यक्ष, अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट, भवानी पेठ) : संकल्प ते सिद्धी सोहळा हा एक वेगळा आध्यात्मिक कार्यक्रम तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल. संतांच्या पादुका दर्शनाद्वारे भाविकांना अध्यात्माची अनुभूती घेता येईल. त्याद्वारे मनाला शांती आणि आध्यात्मिक मार्ग मिळणार आहे. अशा उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होताना आनंद होत आहे.

रवींद्र माळवदकर (अध्यक्ष, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळ) ः प्रत्येक व्यक्ती मनःशांतीसाठी स्वतःच्या पातळीवर प्रयत्न करीत असते. भारतात रामायण काळापासून पुढे संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराजांच्या पादुकांची सेवा करण्याची आपली परंपरा आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक भाविकाला एकावेळी अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार ही सर्वात आनंदाची बाब आहे. या उत्सवात सर्व समाजघटकांना जोडून घेतले जावे. उदय जगताप (कार्याध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ) : महाराष्ट्रासह भारतातील संत परंपरेने आपल्याला माणुसकीची शिकवण दिली. आता याच माणुसकीच्या धर्माची समाजाला गरज आहे. या उपक्रमाद्वारे ‘सकाळ’ने सर्वसामान्य भाविकांसाठी श्रद्धेचे महाद्वार खुले करण्याचे कार्य केले आहे. अशा राजकारणविरहित व्यासपीठाची नितांत गरज आहे.

Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan sohala 2024 : आतुरता श्रीगुरूंच्या पादुका दर्शनाची

शैलेश बढाई (पुणे बढाई समाज ट्रस्ट) : या उपक्रमाद्वारे धार्मिक, अध्यात्मिकतेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. मानसिक समाधानासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे. सध्याच्या ताणतणावाच्या काळात मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी अशा उपक्रमाचा नागरिकांना फायदा होईल. वैभव शृंगारपुरे (झाडे लावा, झाडे जगवा फाउंडेशन) : शहरी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना तणावमुक्त करायचे असेल तर त्यांना आर्थिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे. याबरोबरच आपण अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याची सुरवात वृक्ष लावून करावी.

राघवेंद्र मानकर : श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम अंतर्गत पादुका दर्शन कार्यक्रम आनंदी जीवनासाठी उपयुक्त ठरेल. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामुळे दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठीचे बळ मिळू शकले. तणावमुक्त जीवन कशा पद्धतीने जगता येईल, याचा वेगळा विचार मिळू शकणार आहे. सत्येंद्र राठी (के ॲण्ड क्‍यू परिवार) : समाजाला पादुका दर्शन सोहळ्यासारख्या सार्वजनिक व्यासपीठाची नितांत गरज होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व संतांचे विचार देशभर पोहोचण्यास निश्‍चितच मदत होईल.

राजेंद्र परदेशी (त्रिमूर्ती ट्रॅव्हल्स) : पादुका दर्शन उत्सव हा अतिशय स्त्युत्य उपक्रम आहे. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणांनाही फायदा होईल. हर्षदा फरांदे (शहराध्यक्षा, भाजप महिला मोर्चा) : हा उपक्रम चांगला असून समाजाला त्याद्वारे दिशा मिळू शकणार आहे. याबरोबरच नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखी होण्यासही मदत होणार आहे. भावना शेळके (सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा) : सध्याच्या काळात आपल्या रोजच्या जीवनाला अध्यात्माची जोड देण्याची गरज आहे. उपक्रमाद्वारे आध्यात्मिक जोड मिळेल त्याचबरोबर तरुणाईला अध्यात्माची गोडीही लागेल.

केतकी कुलकर्णी (सरचिटणीस, भाजप कोथरूड लोकसभा संयोजक) : समाजाला अध्यात्माचीही गरज आहे,. अध्यात्म व समाजप्रबोधनाचा चांगला मार्ग म्हणजे हा उपक्रम आहे. हा उपक्रम योग्य वेळी आल्याने समाजाला योग्य दिशा मिळेल. नामदेव माळवदे (अध्यक्ष, शिवांजली मंडळ) : जीवनात गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. या उपक्रमातून गुरूंचे मार्गदर्शन व संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. अरविंद सुपेकर (शिवराज मित्र मंडळ) : अध्यात्म म्हणजे काय, गुरूचे महत्त्व म्हणजे काय, याबद्दलची सर्वंकष माहिती या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना मिळेल. अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे.

विश्‍वनाथ भालेराव (अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पुणे केंद्र) ः संत महात्म्यांना मानणारी आमची पिढी आहे. गुरूचा शोध आणि बोध कायमच सुरू असतो. पादुका दर्शनातून मनःशांती मिळण्याची चांगली संधी मिळत आहे. शिरीष आठल्ये (अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र) : सध्याची पिढी भौतिक सुखाच्या मागे लागली आहे, मात्र त्यांना मानसिक समाधान मिळत नाही. हेच मानसिक समाधान मिळवून देण्याचे काम हा उपक्रम करेल. या उपक्रमातून अनेकांना शिकायला मिळेल आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शनही होईल. योगेश भोकरे : या उपक्रमामुळे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांना संतांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार असल्याने त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. सुरेश जैन (अध्यक्ष, महाराष्ट्र नागरिक कृती समिती) : पादुका दर्शन उपक्रम भाविकांसाठी महत्त्वाचा व स्त्युत्य आहे. एकाच ठिकाणी पादुका दर्शनामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे.

Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024: पुण्यातून पादुका दर्शन सोहळ्यासाठी बससेवा उपलब्ध आहे का?

भाविकांसाठी पुण्यातून बससेवा

‘श्री गुरू पादुका दर्शन उत्सवा’साठी

भाविकांना पुण्यातून नवी मुंबईला जाणे सुलभ होणार आहे. त्यासाठी ‘पर्पल मेट्रोलिंक’ने सवलतीच्या दरात वातानुकुलित बससेवा उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) ही सेवा पुणे शहरातून उपलब्ध असेल. त्यामुळे भाविकांना श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुण्यात वेळेत परतणे शक्य होणार आहे.

या दोन दिवसांच्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून नागरिकांना येता येणार आहे, तसेच पुण्यातूनही विविध मंदिरांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, भजनी मंडळ, कीर्तनकार आदी विविध स्तरांतील नागरिक दर्शनासाठी नवी मुंबईत जाणार आहेत. ज्या नागरिकांकडे वाहनव्यवस्था नाही, त्यांच्यासाठी ‘पर्पल मेट्रोलिंक’तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यातून बस वाशी प्लाझा येथे नागरिकांना सोडेल. तेथून सिडको एक्झिबिशन सेंटर अगदी जवळच आहे.

बससेवेचा तपशील...

कधी : २६ आणि २७ मार्च रोजी

वेळ : पुण्यातून सकाळी सात वाजल्यापासून दर तासाला,

नवी मुंबईतून पुण्यात येण्यासाठी रात्री आठपर्यंत

शुल्क : जाऊन-येऊन प्रतिमाणशी ५०० रुपये भाडे

पुण्यातून कोठून बस सुटणार : स्वारगेट (मित्रमंडळ चौक),

कोथरूड (मोरे विद्यालयापासून), वाकड (शनी मंदिराजवळ, इंदिरा कॉलेजसमोर)

वाशीहून कोठून बस सुटणार : वाशी प्लाझापासून

बस प्रवासासाठी संपर्क : पर्पल मेट्रोलिंक (कोथरूड ऑफिस) -

९११२४४७४७४, ०२०-२५४४२६४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.