Paduka Darshan Sohala 2024 : सेवाभावाचा आनंद इतरांनाही मिळू द्या! ; डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमचा उद्देश आपल्या सर्वांना सद्‍गुरू कृपा मिळावी, हा होता. तो यशस्वी झाला असून, आता सद्‍गुरू कृपेने लोकसेवा, परोपकार आणि सेवाभाव जोडला गेला आहे.
Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024sakal
Updated on

नवी मुंबई : ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमचा उद्देश आपल्या सर्वांना सद्‍गुरू कृपा मिळावी, हा होता. तो यशस्वी झाला असून, आता सद्‍गुरू कृपेने लोकसेवा, परोपकार आणि सेवाभाव जोडला गेला आहे. त्यातून मिळालेला आनंद आता आपण इतरांना मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ व ‘विश्व फाउंडेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी केले.

‘सकाळ’ आयोजित ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅम अंतर्गत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २७) डॉ. राजिमवाले बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘श्री एम सत्संग फाउंडेशन’चे प्रमुख पद्मभूषण श्री एम, ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार उपस्थित होते. या वेळी डॉ. राजिमवाले यांनी अनन्य भक्ती म्हणजे काय, ती कशी प्राप्त होते, याबाबत सविस्तर विवेचन केले.

भगवद्‍गीतेत भगवंताने अनन्य भक्ताचा मी योगक्षेम चालवतो असे म्हटले आहे, याचा संदर्भ देत ते म्हणाले, की अनन्य भक्तीत संकुचितपणा नसतो, सर्वांप्रती समानत्व आणि एकत्वाची भावना असणे म्हणजे अनन्य भक्ती. परमसद्‍गुरू म्हणतात, की अनन्य भाव येण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे व आपल्यात ईश्वर आहे, असा भाव ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी गुरुशरण जाणे हाच मार्ग आहे.

Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024: अडीचशे सेवेकऱ्यांनी घेतले गुरु पादुकांचे दर्शन!

आजच्या कार्यक्रमातून आपण सर्व जण गुरूंना शरण गेलेलो असल्याने जीवनातला पहिला पडाव आपण पार केला आहे. सद्‍गुरूंनी सत्य धर्माला शरण जाण्याचा मार्ग सांगितला आहे. सत्य धर्म म्हणजे सद्‍गुरूंनी उपदेशीत केलेल्या मार्गावरून जाणे. तोच आपला स्वधर्म असतो. आज आपण सर्वांनी तोही पडाव पूर्ण केला आहे. आपण सर्व जण येथे एकत्र आलो असून आपल्या सर्वांच्या मिळून सत्य धर्माचा संघ झाला आहे.

हे सत्याला शरण जाणे, सत्य धर्माला शरण जाणे व त्यासाठी एकत्र येण्याची तीनही कार्ये आपल्या हातून घडल्याने आपल्यात अनन्यभाव निर्माण होणार आहे. या अनन्यभावामुळे आपल्या जीवनाची दोर भगवंताने पकडली आहे. अनेक जन्म घेतल्यानंतर जो अनन्यभाव येतो, तो सद्‍गुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांत निर्माण झाला आहे. सद्‍गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनात निर्माण झालेला हा आनंद इतरांना द्यायचा आहे. लोकसेवा, परोपकार व सेवाभावाने जीवन भरून टाका. हाच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

आपलेही गुरूंना देणे लागते

आपल्या सर्वांवर झालेल्या गुरुकृपेने आपलेही गुरूंना काही देणे लागते. त्यामुळे सद्‍गुरूंनी सुरू केलेल्या या विश्वकल्याणाच्या यज्ञात आपल्या जीवनाची आहुती देण्याचा संकल्प करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश ठेवा, असेही डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.