मुंबई : प्रसिद्ध गायक हरिहरन (Singer Hariharan) यांच्या अद्भुत सुरांनी आज हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. ‘सांवरो मंगल रूप निधान, जा दिन तें हरि गोकुल प्रगटे दिन दिन होत कल्याण...’ या भक्तिगीताने सूरमयी सोहळ्याची सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या भावभक्तीच्या सांगीतिक कार्यक्रमाला गुरूसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘सकाळ’तर्फे श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमअंतर्गत (Sri Family Guide Initiative) श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याच्या (Paduka Darshan Sohala 2024) पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायक हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रमाची पर्वणी उपस्थित गुरूसेवकांना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमात सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांची भक्तिगीते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईकरांनी (Navi Mumbai) उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis) यांनी शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचे स्वागत केले.
‘हरी का ध्यान लगा मन मेरे, मीट जाये सब दु:ख तेरे’ या भक्तिगीताने भाविकांना खिळवून ठेवले. ‘राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी’च्या तालात भाविक तल्लीन झाले. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल..’, ‘हरी का ध्यान लगा मन मेरे’, ‘सुबह सुबह कर ले शिव का नाम, करले बंदे ये शुभ काम’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..’ अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांच्या रचना त्यांनी सादर केल्या. त्यामुळे भाविकांसाठी हा अविस्मरणीय असा अनुभव होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.