Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची

महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार
Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची
Updated on

Mokhada: ऊमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालघरमध्ये महायुतीचा ऊमेदवार कोण? हा सस्पेंस होता. त्याचवेळी भाजपने गुगली टाकत, राजेंद्र गावीत यांचा पत्ता कट करून, निष्ठावान कार्यकर्ता डाॅ. हेमंत सवरा यांना ऊमेदवारी दिली आहे.

हेमंत सवरा हे दिवंगत भाजप नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे पालघर ची निवडणुक अटीतटीची होणार आहे. पालघर मध्ये आता महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  

Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची
Palghar News: ठाणे शिंदेंना मिळाले मात्र पालघर पुन्हा भाजपकडे जाणार?

  पालघर च्या जागेवर महायुतीत शिवसेनेने अधिकार सांगितला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी महिनाभरापुरर्वीच पालघर मध्ये येऊन विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांची ऊमेदवारी देखील जाहीर केली होती.

त्यानंतर राजेंद्र गावीत यांनी प्रचारही सुरू केला होता. त्याचवेळी भाजप पदाधिकार्यांनी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याचवेळी राजेंद्र गावीत यांनी निशानी कोणत्याही पक्षाची मिळाली तरी ऊमेदवार आपणच असणार असे माध्यमांना सांगितले होते. 

              त्यामुळे पालघर मधील भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला कडाडून विरोध केला तसेच राजीनाम्याचा ईशारा देऊन बंडाचा झेंडा ऊभारला होता. त्याची दखल भाजप च्या वरिष्ठांना घ्यावी लागली आहे. हे नाराजीनाट्य महिनाभर सुरू राहीले होते.

Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची
Palghar News: अल्पसंख्याकांची नाराजी कोणाला भोवणार? ठाकरेंकडे कल मात्र...

दुसरीकडे महाविकास आघाडी ने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांना ऊमेदवारी देऊन प्रचाराला सुरूवात देखील केली. ऊध्दव ठाकरे यांनी पालघर मध्ये सभा घेऊन रणशिंग फुंकले. त्यापाठोपाठ जिल्ह्यात राजकीय ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडी ने बोईसर चे आमदार राजेश पाटील यांना ऊमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात ऊतरवले. 

              एव्हढ्या मोठ्या राजकीय घडामोडी घडुनही भाजप ने आपला ऊमेदवार जाहीर केला नाही. अखेर, ऊमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप ने आपला हुकुमाचा पत्ता बाहेर काढला. राजेंद्र गावीतांचा पत्ता कट करून निष्ठावान कार्यकर्ता डाॅ हेमंत सवरा यांना ऊमेदवारी देऊन पालघर मध्ये गुगली टाकली आहे.

हेमंत सवरा हे दिवंगत भाजप नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नावाला जिल्ह्यात वलय आहे. पालघर च्या आदिवासी ग्रामीण, शहरी व सागरी भागात हेमंत सवरा यांचे मोठे काम आहे. तसेच सवरा कुटुंब संघ परिवाशी अगदी निगडीत आहे. त्यामुळे भाजप ने जिल्ह्यात हुकुमाचा पत्ता टाकुन महायुती मध्ये चैतन्य निर्माण केले आहे. 

Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची
Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भीषण समस्या

पालघर मध्ये तिरंगी लढत होणार.....

जिल्ह्यातील सहा विधानसभांपैकी तीन जागेवर बहुजन विकास आघाडी चे आमदार आहेत. वसई- विरार महापालिकेवर एकहाती अंमल होता. तसेच जिल्हा परिषदेतही त्यांचे मोठ्या संख्येने सदस्य आहेत. त्यांनी बोईसर चे आमदार राजेश पाटील यांना रिंगणात ऊतरवले आहे.

शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांना ऊमेदवारी दिली आहे. आता महायुती कडून डाॅ हेमंत सवरा यांना ऊमेदवारी दिल्याने, पालघर मध्ये तिरंगी लढत होऊन यंदाची निवडणुक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. 

Palghar News: डाॅ. हेमंत सवरांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची निवडणुक होणार अटीतटीची
Palghar News: अल्पसंख्याकांची नाराजी कोणाला भोवणार? ठाकरेंकडे कल मात्र...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.