Palghar: मोखाड्यात मुसळधार पावसामुळे कोसळली घरं, वाचा नक्की काय घडलं!

 मोखाड्यात मुसळधार पावसामुळे कोसळली घरं, वाचा नक्की काय घडलं!
Palghar:sakal
Updated on

Mokhada : मोखाड्यात गेली पांच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील घानवळ, धामणी आणि ब्राम्हणगांव येथे घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये घानवळ येथे कोसळलेल्या घरात वसंत भावडु पिठोले यांच्या डोक्याला मार लागल्याची घटना घडली आहे. संबंधित ठिकाणची पाहणी व पंचनामे तेथील तलाठ्यांनी केले आहेत.

 मोखाड्यात मुसळधार पावसामुळे कोसळली घरं, वाचा नक्की काय घडलं!
Mokhada News: अवकाळीच्या पीडीतांना भाजपचा दिलासा

 मोखाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीच्या लावणीचे कामे ठप्प झाली आहेत. तसेच विजेचा कायम लपंडाव सुरू आहे. तर तालुक्यातील घानवळ येथे आनंदी भावडु पिठोले यांच्या घराचे कौलारू छत कोसळले आहे. त्यावेळी घरात असलेले वसंत भावडु पिठोले यांच्या डोक्यात कौलं आणि लाकडी वासे पडल्याने, त्यांच्या डोक्याला मुका मार लागला आहे. 

               तसेच धामणी येथे धाकल्या नवसु पढेर आणि ब्राम्हणगांव येथील जयराम किसन मौळे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. सुदैवाने तिनही घटनेत जिवीतहानी टळली आहे. मात्र, या आदिवासी कुटूंबाचे संसार, मुसळधार पावसात ऊघड्यावर आले आहेत. या ठिकाणांची तलाठ्यांनी पाहणी केली असुन त्याबाबतचे अहवाल तहसीलदार कार्यालयाला दिल्याची माहिती तहसीलदार मयुर खेंगले यांनी दिली आहे. 

 मोखाड्यात मुसळधार पावसामुळे कोसळली घरं, वाचा नक्की काय घडलं!
Mokhada News : 'एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा' श्रमजीवी संघटनेचा पाण्यासाठी एल्गार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.