Javhar Crime: अंमली पदार्थाचे सेवन करून तरुण पिढी शारीरिक आरोग्य गमावत आहे, ही बाब अतिशय संवेदनशील आहे.जव्हार तालुक्यात नेहेमीच अंमली पदार्थ तस्करी बाबत सावधगिरीची भूमिका पोलीस यंत्रणा विविध माध्यमांतून घेत आहे.
याचाच प्रत्यय हा शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवनेरी ढाबा डहाणू नाका येथे सुमारे १२ लाख रुपयांचा अमली पदार्थ, गांजा हस्तगत करून जव्हार पोलिसांच्या धडक कारवाईने आला.जिल्हा भरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्हाभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे.
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील , अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागांत नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे, दरम्यान ,शनिवारी संध्याकाळी ६ वाजता शिवनेरी ढाबा, डहाणू नाका येथे एम.पी.४६जी.२२४९ या क्रमांकाची पीक अप गाडी निदर्शनास आली.
यात भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट आढळले,उपस्थित पोलीस टीमला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता,सहा प्लॅस्टिकच्या कॅरेट मध्ये ३१ किलो ८६८ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा , एकूण मूल्य सात लाख ९७ हजार चारशे पन्नास रुपये, महिंद्रा पीक अप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि प्लास्टिक कॅरेट ६० मूल्य रुपये तीन हजार असे सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यात सुनील तुकाराम आर्य २४ वर्ष, श्रीराम दिनेश सोलंकी वय २१ वर्ष हे दोघेही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) , २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जव्हार पोलीस ठाणे प्रभारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
या वेळी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे , पोलीस उप निरीक्षक अनिल दिघोळे, वाहतूक विभागाचे एस.आय.सालकर, प्रदीप विटकर, नंदकुमार गायकवाड, सोपान भोगाडे, कैलास राठोड आदी टीम उपस्थित होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.