Palghar News: ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडकला लाल फितीत!

मागील 8 ते 10 वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे. प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पांच वर्षापुर्वी मंत्रालयात पाठवला आहे. मात्र, आजही दफ्तरदिरंगाई मुळे मंत्रालयात तो लालफितीत अडकून पडला आहे.
Palghar News
Palghar Newssakal
Updated on

मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही मुख्य  महत्त्वाची बाजारपेठ आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील गावपाड्यांसह लगतच्या जव्हार, शहापुर, वाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रूग्ण ऊपचारासाठी येतात.

त्यामुळे आरोग्य केंद्रावर रूग्णांची नियमीत गर्दी असते. येथे अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून  मागील  8  ते   10   वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे. प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पांच वर्षापुर्वी मंत्रालयात पाठवला आहे. मात्र, आजही दफ्तरदिरंगाई मुळे मंत्रालयात तो लालफितीत अडकून पडला आहे. 

Palghar News
Palghar Bus Accident : बस- डंपरमध्ये भीषण अपघात; दोन जण ठार, १५ प्रवासी जखमी

खोडाळा गांव व परिसरातील वाढती लोकसंख्येसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत  24  महसुली गावे आणि जवळपास  60  खेडीपाडी येतात. त्यांची लोकसंख्या  30  हजाराच्या पुढे आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट,देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते थेट पहिणा या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रूग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी येतात. याबरोबर शहापुर तालुक्यातील विहीगांव, माळ, दापुर वाडा तालुक्यातील तीळमाळ, भिलमाळ, ओगदा आणि जव्हार तालुक्यातील भुरीटेक गावासह लगतच्या खेड्यापाड्यातील रूग्णांचा भार ही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला सोसावा लागतो आहे.

आरोग्य केंद्रात नियमीत कुटुंब नियोजन शिबीरांसह ईतर वैद्यकीय तपासणी शिबीरांचे आयोजन केले जात असते. वाढणारा रुग्णांचा भार लक्षात घेऊन, खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन  30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. त्या बाबतचा सर्व सरकारी सोपस्कार पार पाडून, प्रस्ताव मागील पांच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडून आहे.  वाडा शहरात मोठी खाजगी रूग्णालये आहेत. गंभीर रूग्णांना तातडीने रूग्ण सेवा ही मिळते. असे असताना वाडा शहरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या परळी आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लगबगीने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने ख-या गरजवंताना सापत्न वागणूक दिली असल्याची लोकभावना येथील नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे. 

Palghar News
Palgar : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या हजाराच्या वर

मोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे 4, आरोग्य पथके, दक्षता पथके 3 रेस्क्यू कॅंप 7 , आयूर्वेदिक दवाखाना 1 आणि तब्बल 21 उपकेंद्राची उपाययोजना करुन लाखो रुपयांचा खर्च केला व करीत आहे. त्यापैकी खोडाळा विभागात 1 प्राथमिक आरोग्य केंद्र , 3 आरोग्य पथकं , 6 उपकेंद्र आणि 2 रेस्क्यू कॅंप च्या माध्यमातून जुजबी आरोग्य सेवा कार्यरत आहे.

मात्र, असे असतानाही येथील आम जनतेला अधिकची आरोग्य सेवा मिळविण्यासाठी जव्हार अथवा नासिक येथे जिल्हा रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे.त्यामूळे परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथील जनता, खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे म्हणून शासनाकडे दाद मागत आहे.परंतू शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तव मागणीकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे.    

        ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व निकषांत बसत असल्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य संचालक यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला कुपोषण निर्मुलन टास्क फोर्सचे अध्यक्ष माजी आरोग्य मंत्री डाॅ दिपक सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. परंतू त्यावर कार्यवाही मात्र शुन्य आहे. त्यामूळे मागील 8  ते  10  वर्षांच्या नागरीकांच्या न्याय्य मागणीला शासनाने दुर्लक्षित केले आहे. 

Palghar News
Palghar News: समितीच्या धडक कारवाईने बोगस डाॅक्टरांचे धाबे दणाणले; कित्येक झाले भूमिगत!

खोडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी शिवसेना आग्रही मागणी करत आलेली आहे. तसेच खोडाळा ग्रामपंचायतीने प्रत्येक वेळी ग्रामसभेचे ठराव संमत करून सादर केले आहेत. तसेच गट क्रमांक  598 मधील 1.63.80   हेक्टर जागाही उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. परंतू शासन त्याबाबत कमालीचे उदासीन धोरण दाखवित असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव सन  2019  मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. आता पुन्हा नव्याने सध्यस्धितीचा आढावा घेऊन, अद्यावत प्रस्ताव जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे महिनाभरापुर्वीच मंत्रालयात पाठविण्यात आला आहे.

* डाॅ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा.

Palghar News
Palghar Crime: कत्तलीसाठी जनावरांची स्कॉर्पिओ गाडीतुन वाहतुक, पोलीसांनी पाठलाग करून गाडी पकडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.