Palghar Lok Sabha  election 2024 voters in Mokhada voting voter turnout Marathi news
Palghar Lok Sabha election 2024 voters in Mokhada voting voter turnout Marathi news

Lok Sabha Election 2024 : मोखाड्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, यंत्रणा मात्र संथ; दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोखाड्यात मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे
Published on

मोखाडा : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोखाड्यात मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. मात्र, मतदान करताना, मतदान यंत्र संथ गतीने चालत असल्याने, मतदानासाठी ऊशीर होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत होत्या. तर दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला आहे. 

विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मोखाडा तालुक्यात एकुण 77 मतदान केंद्र आहेत. तर 59  हजार 358 मतदार आहेत. सकाळपासून तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी, मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, यंत्रणा संथ गतीने काम करत असल्याने, एका मतदानासाठी 5 ते 10 मिनिटे लागत असल्याच्या तक्रारी आमदारांकडून आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना केंद्राबाहेर वाट पहावी लागत होती. विशेषतः महिला व वृध्द मतदारांनी वाट पाहून घरची वाट धरली. 

Palghar Lok Sabha  election 2024 voters in Mokhada voting voter turnout Marathi news
RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

दुपारनंतर ऊन्हाची तिव्रता कमी झाल्याने, मतदार पुन्हा मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याची दिसून आली आहे. तालुक्यातील वाशिंद - दुधगाव मतदान केंद्रावर मतदानाच्या आकडेवारीत फरक आढळून आल्याने, मतदान अर्धा ते एक तास बंद करण्यात आल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. तर एका मतदानासाठी 10  मिनिटे लागत असल्याने, मतदारांमध्ये नाराजी असल्याचे संजय मांगे या मतदाराने सांगितले. 

Palghar Lok Sabha  election 2024 voters in Mokhada voting voter turnout Marathi news
Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.