Mumbai : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला उत्तरोत्तर रंग चढू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपित नागरिकांची सहानभूती कशी मिळेल, याची धडपड सुरू झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना वाढवण बंदरविरोध हा मुद्दाही चघळला जात आहे. त्यातच आता वसई-विरार महापालिकेत समाविष्ट २९ गावांबाबतही गाजर दाखवले जात आहेत.
सध्या महायुती, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात निवडणुकीवरून धुमशान सुरू झाले आहे. मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना आपला उमेदवार कसा निवडून येईल, यावरून कुरघोडी पाहावयास मिळत आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी तर अनेक मुद्द्यांवर हात घातला आहे. त्यात वाढवण बंदराला तीव्र विरोध केला आहे. वाढवण बंदराचा मुद्दा चिघळत असतानाच वसई-विरार महापालिकेत समाविष्ट असणाऱ्या २९ गावांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केले आहे.
सरकार असताना गावे का वगळली नाही? आमचे सरकार आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलून दाखवले. मात्र, ते सरकारमध्ये असताना हा निर्णय का झाला नाही, अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे पालघर लोकसभा मतदारसंघात पाणी, आरोग्य, रस्ते मार्ग, पर्यायी व्यवस्था अशा मुद्द्यांना प्राधान्य देत गावोगावी नागरिकांच्या भेटी दिल्या जात आहेत. तर शहरी भागात स्टार प्रचारकांचा प्रवेश होत आहे. असे असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार भावनिक मुद्द्यांवर बोलत आहेत.
निवडणुकीच्या काळात नागरिकांना कुरवाळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मतदानाला चारच दिवस दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान अनेक मुद्दे, विविध विषय समोर येणार असल्याचे दिसून येत आहे. त्यावर मतदानाचा जोगवा पदरात पाडण्यासाठी आश्र्वासनांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे.
अमित शहा यांनी ठाकरे आणि इंडिया आघाडीला टार्गेट केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बविआसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यानंतर बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही भाजपच्या उत्तराला प्रतिउत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी तर गावांचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यामुळे नेमकी कोणाची भूमिका खरी आहे, यावर विविध चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.