Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!
Palghar Loksabhasakal

Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!

Published on

भगवान खैरनार, - सकाळ वृत्तसेवा. 

Mokhada:  पालघर लोकसभा निवडणुकीत महायुती कडून डाॅ हेमंत सवरा, महाविकास आघाडी च्या ऊमेदवार भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडी चे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. यांच्या प्रचारासाठी केंद्रिय मंत्री, पालकमंत्री तसेच पक्ष प्रमुखांनी सभा घेतल्या आहेत.

त्यामुळे निवडणुक रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली आहे. मतदान होऊन दहा दिवस झाले आहेत. निकालासाठी अवघे चार दिवस ऊरले आहेत. त्यामुळे ऊमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. सर्व ऊमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतांची आकडेमोड केली असुन तिन्ही ऊमेदवारांनी विजयाची खात्री असल्याचा दावा केला आहे. 

Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!
Palghar Loksabha: पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचा महायुतीला पाठिंबा, वाचा कसा होणार सेना- भाजपला फायदा

 यंदाची पालघर लोकसभा निवडणुक अटीतटीची झाली आहे. महाविकास आघाडी कडून  शिवसेना ( ऊबाठा ) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, तर महायुती कडून केंद्रिय गृह मंत्री अमित शहा, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सभा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

तसेच बहुजन विकास आघाडी चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या एक खांबी नेतृत्वाखाली, बहुजन विकास आघाडी ने महायुती आणि महाविकास आघाडी पुढे तगडे आव्हान ऊभे केले आहे. या निवडणुकीच्या निकालाला अवघे चार दिवस ऊरले आहेत. या निकालावर सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

                पालघर लोकसभा मतदार संघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई हे सहा विधानसभा क्षेत्र आहे. यावेळी   63 : 91  टक्के ईतके मतदान झाले आहे. या मतदार संघात  21  लाख  48  हजार   514  ईतके मतदार आहे. यापैकी  13  लाख  73  हजार  162  एव्हढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान ग्रामीण भागात झाले आहे.

त्यामुळे ग्रामीण भागाने मतदारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद केले आहे. सर्वाधिक मतदान विक्रमगड, त्या खालोखाल अनुक्रमे डहाणू, पालघर, बोईसर, वसई आणि नालासोपारा या विधानसभा क्षेत्रात झाले आहे. महायुतीचे ऊमेदवार डाॅ हेमंत सवरा आणि महाविकास आघाडी च्या ऊमेदवार भारती कामडी हे दोन्ही ऊमेदवार विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील तथा ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या भागात मतांची विभागणी झाली आहे.

Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!
Palghar Loksabha Election : पालघर निवडणुकीसाठी चिन्हवाटप! कोणाला मिळाले कोणते चिन्ह पहा?

      नालासोपारा, वसई आणि बोईसर ह्या मतदार संघावर बहुजन विकास आघाडी चे वर्चस्व आहे. मतदार संघात याच विधानसभा क्षेत्राचे सर्वाधिक मतदार आहेत. तसेच राजेश पाटील हे बोईसर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी बहुजन विकास आघाडी चे ऊमेदवार राजेश पाटील हे प्रथम क्रमांकाचे ऊमेदवार असणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

तर ग्रामीण भागातील मतदारांनी राजेश पाटलांना किती पसंती दिली आहे. यावर राजेश पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच बहुजन विकास आघाडी चे वर्चस्व असलेल्या मतदार संघात महायुती चे डाॅ हेमंत सवरा आणि महाविकास आघाडी च्या भारती कामडी यांनी किती मतदान मिळवले आहे यावर त्यांचे विजयाचे गणिते आखली गेली आहे. 

गाव कट्टा, पारावर चर्चा आणि पैंजा........

खरे राजकारण हे गाव पातळीवर खेळले जाते. याचा प्रत्यय झालेल्या मतदानाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. पालघर च्या ग्रामीण भागात गेली दहा दिवसांपासून, गाव कट्टा आणि पारावर लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत.

तिरंगी लढतीतील प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपलाच ऊमेदवार निवडुन येणार आहे, असा दावा करीत आहेत. त्यासाठी एकमेकांध्ये पैजा ही लावल्या जात आहेत. त्यामुळे निकाल लागेपर्यंत गाव खेड्यापाड्यातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. 

Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!
Palghar Loksabha: पालघरमध्ये चौरंगी लढतीची शक्यता? महायुतीचा तिढा सुटेना, बहुजन विकास आघाडीचा ऊमेदवार गुलदस्त्यात!

  मतदान होऊन दहा दिवस झाले आहेत. गेली दहा दिवसांपासून ऊमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतांची आकडेमोड करत आहेत. या आकडेमोडीत बहुजन विकास आघाडी चे ऊमेदवार राजेश पाटील, महायुतीचे डाॅ. हेमंत सवरा आणि महाविकास आघाडी च्या ऊमेदवार भारती कामडी यांनी यांनी आपणच विजय संपादन करणार अशी खात्री देत विजयाचा दावा ' सकाळ ' शी बोलताना व्यक्त केला आहे.

पालघर लोकसभा मतदार संघाच्या विधानसभा निहाय  मतांची आकडेवारी.....

विधानसभा  -  मतदार  -  झालेले मतदार  - टक्केवारी

डहाणू  -        283419 -   209010  -     73 : 74

विक्रमगड-     301964 -   224815 -      74 : 45

पालघर  -      282686 -   198851 -      70 : 34

बोईसर  -      384233 -   248451 -      64 : 66

नालासोपारा- 557671 -   291875 -      52 : 33

वसई  -         338541 -  200160 -       59 : 12

एकुण   -    2148514 - 1373162 -     63 : 91.

Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!
Palghar Railway Accident : अखेर २६ तासांनी विरारकडे सुटली पहिली लोकलं, रेल्वेच्या प्रयत्नांना आले यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.