Loksbha Election 2024: पालघर, भिवंडी,कल्याण आणि ठाणे या मतदार संघात श्रमजीवी संघटनेची ताकद मोठी असून या संघटनेचे सर्वोसर्वा विवेक पंडित यांनी आज संघटनेचा महायुतीला पाठिबा जाहीर केल्याने महायुतीचे पारडे जाड झाले आहे.
विवेक पंडित यांनी गेल्या महिन्या भर पासून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पाणीप्रश्नाआवरुं रान उठवले होते. तर त्या आगोदर मुलाच्या नवा मध्ये आईचे नाव लावण्याचा कायदा करण्यास शासनास भाग पडले होते. त्यामुळे श्रमजीवी संघटनेची ताकद या दोन जिल्ह्यात वाढली असल्याने श्रमजीवी संघटनेचा पाठिम्बा कोणाला मिळणार याबात उत्सुकता होती. ती उत्सुकता आज विवेक पंडितांनाही महायुतीला पाठिंबा देऊन संपुष्ठात आणली.
विवेक पंडित यांनी याबाबत काढलेल्या निवेदनात म्हटले आहे कि., लोकसभेची निवडणूक सुरु आहे. प्रत्येकाचे विचार आहेत. ज्यांनी त्यांनी आपला विचार मांडावा, त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करावा. हे करीत असताना कुणी धार्मिक तेढ निर्माण होईल असे करू नये. या देशावर त्या सर्वांची समान मालकी आहे, ज्यांचे या देशावर प्रेम आहे. देश, देशाचे पवित्र संविधान,देशाचा विकास, देशाची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवा. असे सांगून मी आणि श्रमजीवी संघटनेने हाच विचार करून महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसईतील बंधुभाव बिघडेल इतका विषारी प्रचार कुणी करू नका. आपण ज्या पक्षाचा प्रचार करीत आहात तो का योग्य आहे, हे सांगा परंतु दुसऱ्याबद्दल बोलताना, लिहिताना तोल जाऊ देऊ नका, आपली एकमेकांना नेहमी मदत लागते, आणि मी जात धर्म, पक्ष न बघता माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला माझ्या परीने सहाय्य करीत असतो, हे लक्षात घ्या.असे आवाहन वसई विरार मधील मतदारांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.