Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !

Latest Palghar St News: बस नादुरुस्त होण्याचे तसेच टायर पंचर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !
Updated on

, - सकाळ वृत्तसेवा.

Latest Maharasthra News:   जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील नागरीकांना, सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एस टी आगाराचा आधार आहे. जव्हार एसटी आगारातून गाव खेड्यापासुन ते वेगवेगळ्या शहराकडे जाण्यासाठी एसटी बस च्या फेर्या चे नियतन करण्यात आले आहे.

मात्र, मागील काही महिण्यांपासुन बस ची दुरावस्था झाली आहे. अनेक बस च्या खिडक्या, खुर्च्या ( आसने ) तुटलेल्या आहेत. गळके छप्पर तर कधी खालच्या बाजुने पावसाचे पाणी गाडीत येत आहे. वेळेत बस न येणे, प्रवासा दरम्यान मध्येच बस नादुरुस्त होण्याचे तसेच टायर पंचर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. 

Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !
Palghar पुन्हा हादरलं! नालासोपाऱ्यात चाकूचा धाक दाखवत ३२ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार, दोघे फरार

   ग्रामीण भागातील दळणवळणात, एसटी महामंडळाच्या लालपरी ची महत्त्वाची भुमिका आहे. गाव खेड्यापाड्यापर्यंत लालपरी धावते आहे. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी एकमेव  जव्हार एसटी आगाराच्या बसेस चा आधार आहे. जव्हार आगारातून गावखेड्या पासुन लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बससेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवासाची हमी दुरावली आहे.

                जव्हार आगारात एकुण  56  बसेस आहेत. त्यापैकी  38  बस प्रवाशांसाठी तर  18  बस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत. आगारातून दररोज  53  नियतन ( शेड्युल ) बसफेर्या चे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बस फेर्या आटोपुन, मानव विकास च्या बसही वापरल्या जातात. मात्र, आगारातील बहुतांश बसेस ची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे दररोज  10  ते   15  बसेस दुरूस्ती साठी आगारातच राहतात. परिणामी दिवसभराचे सर्व नियोजन बिघडत आहे. 

               गाड्यांची दुरूस्ती साठी साहित्य नसल्याने, त्यांची व्यवस्थित दुरूस्ती होत नाही. त्यामुळे डेपोतुन वेळेत बस सुटत नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी खिडक्या नसलेल्या, काचा तुटलेल्या, गळक्या बसेस पाठवल्या जातं आहे. अनेक बस मधील सिट तुटलेल्या आहेत. बसच्या खालच्या बाजुने पाणी, प्रवाशांच्या अंगावर येते.

Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !
Palghar: शासनाने आनंदाच्या शिध्याला लावली कात्री, हजारो कुटुंब शिध्यापासुन राहणार वंचित!

अनेक बस रस्त्यातच नादुरुस्त होत आहे, पंचर होत आहे. पंचर टायर काढण्यास सर्व च बसेस मध्ये अवजारे नाही. स्टेपणी ऊपलब्ध राहत नाही. त्यामुळे प्रवाशांना, तेथेच ऊतरवुन मागुन येणार्या, दुसर्या बस मध्ये बसण्याची व्यवस्था कंडक्टरला करावी लागते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. रूग्ण प्रवाशाचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थी शाळेत, चाकरमानी कार्यालयात अथवा घरी वेळेत पोहोचत नाही. 

               मागील दोन महिण्यांपासुन तिन्ही तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमानी आणि ईतर प्रवासी त्रास सहन करत आहेत. याबाबतच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाहीत. त्यामुळे सरकारच्या लाडक्या बहिणी देखील वैतागल्या आहेत. सरकार ने वयोवृद्धांना मोफत तर महिलांना अर्धे भाड्यात प्रवासाची सुविधा ऊपलब्ध करून दिली आहे. मात्र, बससेवा ईच्छीत स्थळी सुखरूप पोहोचवेल याची शाश्वती विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध आणि चाकरमाण्यांना राहिलेली नाही. 

शासनाने महिलांना अर्धे भाड्यात प्रवासाची सुविधा दिली ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, त्यांना ईच्छीत स्थळी सुखरूप पोहोचवतील अशी जव्हार आगारातील काही बसची स्थिती राहिलेली नाही.जुन्या बसेसमुळे विद्यार्थी, महिला आणि चाकरमानी दररोज हैराण होत आहे.या आगाराच्या बहुतांश गाड्यांची अवस्था अगदीच जेमतेम आहे.त्याच अवस्थेत प्रवास करावा लागतो आहे.

* माधुरी आहेर, प्रवासी मोखाडा. 

Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !
Palghar: मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  

मी आता दोन दिवसापूर्वीच जव्हार आगाराचा पदभार स्वीकारला आहे. गाड्यांच्या दुरूस्ती साठी वरिष्ठांकडे स्पेअर पार्ट ची मागणी केली आहे. आगाराचा कारभार लवकरच सुधारेल, त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहे. 

* बाळासाहेब झरीकर, आगार व्यवस्थापक, जव्हार. 

Palghar ST Bus: भंगारात निघालेल्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास; विद्यार्थी, चाकरमानी त्रस्त !
Palghar Loksabha: मोखाड्यात खासदार डाॅ हेमंत सवरांच्या अभिनंदनाचा बॅनर फाडला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.