Palghar: मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  

गेली सहा महिण्यांपासुन मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात अडकला आहे.
 मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  
Palghar:sakal
Updated on

Mokhada: मोखाडा तालुक्यात  2024  या नववर्षाची सुरूवात डेंग्यु च्या साथीने झाली आहे. प्रत्येक महिण्यात डेंग्यु चे रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यु ला अटकाव करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने, नागरीक हवालदिल झाले आहेत. सरकारी अहवालावरून जानेवारी ते जुन या सहा महिण्यात तालुक्यात डेंग्यु चे  24  रूग्ण आढळून आले आहेत.

तसेच मोखाडा ग्रामीण रूग्णालयात जुन आणि जुलै च्या पंधरवाड्यात  3  असे एकूण  27  रूग्ण आढळून आले आहेत. तर खाजगी दवाखान्यात ऊपचार घेण्यार्या रूग्णांची संख्या यापेक्षा दुपटीनेही अधिक आहे. त्यामुळे गेली सहा महिण्यांपासुन मोखाडा तालुका डेंग्यु च्या विळख्यात अडकला आहे. 

 मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  
Mokhada News: अवकाळीच्या पीडीतांना भाजपचा दिलासा

स्वच्छ भारत मिशन योजनेचा बोजवारा ऊडालेल्या मोखाडा तालुक्यात डेंग्यु च्या आजाराने डोके वर काढले आहे. जानेवारी महिण्यांपासुन मोखाड्यात प्रत्येक महिण्यात डेंग्यु चे रूग्ण आढळून येत असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिण्यात आरोग्य केंद्रात येणार्या रूग्णांची रक्त चाचणी करण्यात आली आहे. ऊघडी गटारे, तुंबलेले पाणी साठा, गावापाड्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पसरलेले घाणीचे साम्राज्य  यामुळे प्रत्येक महिण्यात तालुक्यात डेंग्यु चे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असुन, त्यांनी डेंग्यु ला अटकाव करण्यासाठी ऊपाययोजना सुरू केल्या आहेत.

             तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एका ग्रामीण रूग्णालयात थंडी, तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. या व्यतिरिक्त खाजगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी जास्त दिसुन येते आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जानेवारी ते जुन या सहा महिण्याच्या काळात  15  हजार  92  डेंग्यु संशयित रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये  24  रूग्ण डेंग्यु ने बाधीत असल्याचे समोर आले आहे. तसेच दिड महिण्यात मोखाडा ग्रामीण रूग्णालयात  3  डेंग्यु चे रूग्ण आढळून आले आहेत. तर खाजगी दवाखान्यात ऊपचार घेण्यार्या रूग्णांची स्थिती अधिकच भयानक आहे. येथील आकडेवारी याहुनही दुप्पटीने अधिक असुन ती माहिती गुलदस्त्यातच आहे. जुन महिन्यात  4  रूग्ण चिकणगुण्या चे आढळले आहेत. सुदैवाने रूग्ण दगावण्याची एकही घटना तालुक्यात घडलेली नाही.

 मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  
Mokhada News : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरूच; मित्र पक्षालाही दिला धक्का

आरोग्य विभागाकडून कर्मचारी सर्व्हेक्षण करत आहेत. तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने, नागरीक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायती ला औषध फवारणी च्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्थरावर केली जात नसल्याने, नागरीकांना डेंग्यु च्या आजाराला बळी पडावे लागते आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. 

डेंग्यु ला आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, जनजाग्रुती करणे, संशयित रुग्णांची तपासणी करुन योग्य तो औषधोपचार करण्यात येत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी, स्थलांतरीत होऊन आलेल्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे.

डाॅ. भाऊसाहेब चत्तर, 

तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा. 

 मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  
मोखाड्याचा पाणी टंचाईचा वनवास संपला! तालुक्यात तब्बल 50 हजार 494 नागरिकांसह जनावरांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

मोखाड्यात प्रत्येक महिण्यात आढळले डेंग्युचे रूग्ण

महिना    -  घेतलेले रक्ताचे नमुने   -  डेंग्यु रूग्ण...

जानेवारी  -     2  हजार  343    -        3

फेब्रुवारी  -      2  हजार  520    -        8

मार्च      -       2  हजार   351   -        5

एप्रिल    -       2  हजार  735    -        3

में         -        2  हजार  465    -        2

जुन      -        2  हजार   678   -        3

                                                  ( 4  चिकणगुण्या )   

एकुण   -        15  हजार  92    -       24.

ग्रामीण रूग्णालयात  -                          3

एकुण  -                                           27.

 मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  
Konkan Graduate Election : मोखाड्यात पदवीधर निवडणुकीच्या मतदानात राडा; मविआ-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.