Palghar News: पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला

कृषी विभागाने सरकारी दरात बि बियाणे ऊपलब्ध केले आहे. तसेच भरघोस पिकांसाठी खते ही ऊपलब्ध केली आहेत.
पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला
Palghar News: sakal
Updated on

मोखाडा - पावसाची चाहूल लागताच मोखाड्यात खरीपाच्या धुळ वाफेवरच्या पेरणी ला सुरूवात झाली आहे. त्यासाठी कृषी विभागाने बि बियाणे ऊपलब्ध करून दिले आहेत.

तसेच खरीप पिकांसाठी खते देखील ऊपलब्ध करून दिली आहे. तर खतांचा काळाबाजार रोखुन त्यावर अंकुश ठेवण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. 

पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला
Palghar Loksabha: निकालाची तारीख जवळ आल्याने धाकधूक वाढली, तीनही ऊमेदवारांना विजयाची खात्री!

   वर्भभरातुन मोखाडा तालुक्यात ऐकमेव केवळ खरीपाचे च पीक घेतले जाते. खरीपाच्या ऊत्पन्नावरच शेतकर्यांला वर्षभर गुजराण करावी लागते आहे. तालुक्यात खरीपाचे  12   हजार   759 : 56  हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये नागली -  4  हजार  322,  वरई -  3  हजार  885 : 74  आणि भाताचे -  2  हजार  15 : 76   या मुख्य नगदी तृणधान्य पीकाचे  10  हजार  223 : 50  हेक्टर  क्षेत्र आहे.

पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला
Palghar Railway Accident : अखेर २६ तासांनी विरारकडे सुटली पहिली लोकलं, रेल्वेच्या प्रयत्नांना आले यश

त्या खालोखाल ऊडीद, कुळीद, तुरं या कडधान्याचे  1  हजार  788 : 26  हेक्टर क्षेत्र आहे. तर भुईमूग, सुर्यफुल, खुरासणी आणि तिळ या गळीत धान्याचे  747 : 80  हेक्टर क्षेत्र आहे. 

              यंदा राज्यात वेळेत मान्सून दाखल होत असल्याचे, हवामान खात्याने सुचित केले आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकर्यांनी लगबग करून मान्सूनपूर्व शेतीची मशागत पुर्ण केली आहे. आता धुळ वाफेवरच्या पेरणी ला सुरूवात केली आहे.

त्यासाठी कृषी विभागाने सरकारी दरात बि बियाणे ऊपलब्ध केले आहे. तसेच भरघोस पिकांसाठी खते ही ऊपलब्ध केली आहेत. 

पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला
Palghar Train Accident: पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरले; लोकल रेल्वे सेवा ठप्प

    तालुक्यातील पटेल कृषी सेवा केंद्र, समर्थ कृषी सेवा केंद्र, पाटील अॅग्रोटेक, संजेरी कृषी सेवा केंद्र या मोखाडा शहरातील तसेच सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र, हिरवे आणि हरि ओम कृषी सेवा केंद्र, मोरचोंडी येथे खतांचा साठा ऊपलब्ध केला आहे.

या हंगामासाठी युरिया  -  473 :  915  आणि सुफला  -  27 : 5  मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे. दरम्यान, खतांचा काळाबाजार रोखुन त्यावर अंकुश ठेवण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंखे यांनी दिली आहे.  

पावसाची चाहूल लागताच बळीराजा लागला धुळ वाफेवरच्या पेरणीला
Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भीषण समस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.