मोखाडा - प्रेमसंबंधात प्रेमभंग झाल्याने बारावीत शिकणार्या अर्चना ऊदार या विद्यार्थीनीवर कोयत्याने वार करून प्रभाकर वाघरे (22) या तरुणाने तीची निर्घृण हत्या केली होती. हत्या केल्यानंतर प्रभाकर फरार झाला होता.
मोखाडा पोलिसांचे पथके त्याचा शोध घेत असताना, प्रभाकर चा गळफास घेतलेला मृतदेह तुळ्याचापाडा धरणाच्या जॅकवेल वर आज सकाळी आढळून आला आहे. प्रेमभंगातुन अर्चनाची हत्या करून प्रभाकर ने स्वतःला गळफास लावून संपविल्याचा प्राथमिक अंदाज मोखाडा पोलीसांनी व्यक्त केला आहे.
गभालपाडा आश्रमशाळेत 12 वीत शिकणाऱ्या अर्चना उदार(18) या तरुणीची शुक्रवारी सहा तारखेला ,भरदिवसा प्रेमप्रकरणातून धारधार कोयत्याने गळ्यावर वार करून प्रभाकर ने हत्या केली होती.त्या नंतर आरोपी प्रभाकर वाघेरा (22) हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची चार पथके रवाना झाले होते.
मोखाडा पोलीसांनी त्यासाठी स्थानिकांची देखील मदत घेतली. तपास सुरू असताना प्रभाकर च्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅम येथील जॅकवेल च्या लोखंडी गेट ला गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळून आला आहे. रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी 7 ला उघडकीस आले आहे.अशी माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे.
प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी प्रभाकरचे लग्न करून देण्याची मागणी केली होती. मात्र उदार कुटुंबीयांनी अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मोखाड्यात महाविद्यालयीन तरूणांमध्ये प्रेम प्रकरणातून गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याने, पालकांची चिंता वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.