वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपाने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीला शह देण्याच्या हेतूने भाजपाने या भागात स्टार प्रचारकांची फौज उभी केली आहे. नालासोपारा मतदारसंघात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी आणि भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रमुख प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
तर वसईत भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि खासदार मनोज तिवारी यांना प्रचारात उतरवून मोठी गर्दी खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.एका बाजूला भाजपने देशभरातील आपले नेते याठिकाणी प्रचारात उतरवले असताना दुसऱ्या बाजूला मात्र बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हेच स्वतः स्टार प्रचारक होऊन घरोघरी प्रचाराचे रान उठवत आहेत.