मुंबई
Palghar: शिंदे गटात उभी फूट... एक गट बंडखोर उमेदवाराच्या तर दुसरा महायुतीच्या रॅलीत सहभागी, वातावरण तापलं!
Vikramgad Vidahnsabha News: पदाधिकारी महायुती च्या रॅलीत सहभागी झाल्याने, विक्रमगड विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाचे दोन शकले झाली काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि मतदारांमध्ये होऊ लागली आहे.
Latest Mokhada News: पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच होती. मात्र, भाजपने ही जागा आपल्याकडेच राखुन निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र भोये यांना ऊमेदवारी दिली. त्यामुळे सहकारी शिंदे गटाने बंडाचे निशान फडकवले.
शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करून मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष ऊमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निकमांच्या रॅलीत विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर महायुतीचे अधिकृत ऊमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या रॅलीत ही शिंदे गटाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने, विक्रमगड विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाचे दोन शकले झाल्याचे दिसून आले आहे.