Panvel News: पनवेल पालिका, सिडकोविरोधात अवमान याचिका; वाचा नक्की काय आहे प्रकरण?

Panvel News: पनवेल पालिका, सिडकोविरोधात अवमान याचिका; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Panvel News: sakal
Updated on

Navi Mumbai News: खारघरमधील घरकुल वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिन्या, तसेच जनतेच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या समाज मंदिरांची दुरवस्था आदी समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने .सिडको आणि पालिकेला दिले होते.

मात्र, या आदेशांचे पालन न केल्यामुळे ‘माझा भारत सामाजिक संस्थे’ने पालिका आणि सिडकोच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

Panvel News: पनवेल पालिका, सिडकोविरोधात अवमान याचिका; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

खारघर वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतून रस्त्यावर येणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी, तसेच वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरच्या तळ मजल्यावर कौटुंबिक सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले समाज मंदिर, पाळणाघर, वाचनालयाची दुरवस्था झाली आहे.

समस्या दूर कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रहिवासी तथा ‘भारत माझा सामाजिक संस्थे’चे पदाधिकारी ॲड. जे. पी. खारगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायालयाने निकाल देताना सिडको आणि पनवेल महापालिकेने घरकुल वसाहतीमधील सर्व समस्यांविषयी आठ आठवड्यांत योग्य तो निर्णय घेऊन कामे मार्गी लावावीत, असे आदेश दिले होते.

Panvel News: पनवेल पालिका, सिडकोविरोधात अवमान याचिका; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात

मात्र सहा महिने उलटूनही सिडको आणि पालिकेने कोणत्याही प्रकारची कामे केली नाहीत. न्यायालयाचा अवमान केल्यामुळे ॲड. जे. पी. खारगे यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.

घरकुल वसाहत हे खारघरमधील सिडकोचे पहिले गृहसंकुल आहे. या संकुलात नागरिकांच्या हितासाठी उभारण्यात आलेले समाज मंदिर, तसेच रस्ते, सांडपाणी वाहिन्या आदी समस्या सिडको आणि पनवेल महापालिकेने आठ आठवड्यांत मार्गी लावाव्यात, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाची प्रत सिडको आणि पालिकेकडे देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.


- ॲड. जे. पी. खारगे, सेक्रेटरी, माझा भारत सामाजिक संस्था

Panvel News: पनवेल पालिका, सिडकोविरोधात अवमान याचिका; वाचा नक्की काय आहे प्रकरण?
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; बांगलादेशी नागरिकांची धरपकड, कार्यवाही सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.