Panvel Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् मुली पुरविणाऱ्या दलालाला केली अटक, वाचा नेमक काय घडलं?

Navi Mumbai Crime News:पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Crime
CrimeEsakal
Updated on

Latest Panvel News: गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (ता. २०) रात्री पनवेलमधील करंजाडे भागात सापळा रचत गरीब व गरजू महिला व तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका दलालाला अटक केली.

वेजद अल्ली खान ऊर्फ राजू मंडल (वय २९) असे आरोपीचे नाव असून या छाप्यात पोलिसांनी तीन महिला व एक बांग्लादेशी अल्पवयीन मुलगी अशा चार पीडितांची सुटका केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.