Panvel Vidhansabha: ठाकरे, शेकापमध्ये रस्सीखेच; आघाडीत मिठाचा खडा? काँग्रेसचाही दावा!

Latest Navi Mumbai News : पनवेलची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहे.
Panvel Vidhansabha
Navi Mumbai Newsesakal
Updated on

Maharashtra Vidhansabha Election 2024: पनवेल विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांनी दावा केला आहे. यामध्ये शिवसेना(ठाकरे गट) व शेकाप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळत आहे. तसेच काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा आहे. असे असले तरी उमेदवारीसाठी घटक पक्ष असलेल्या शेकापसाठी जागा सोडतील, अशी चर्चा शेकाप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा बाजी मारण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देत मतदार सर्वेक्षण सुरू केले आहे.

नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांना १, ५०, ९२४ मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना १,१९,८८६ मते मिळाली होती. दरम्यान २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.