Ulhasnagar News : ओमी कलानी यांच्या तिकिटासाठी मोर्चेबांधणी; पप्पू कलानी कुटुंब शरद पवार यांच्या दरबारी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल वाजू लागले असून त्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
Sharad-Pawar-and-Pappu-kalani
Sharad-Pawar-and-Pappu-kalanisakal
Updated on

उल्हासनगर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल वाजू लागले असून त्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच उल्हासनगर विधानसभेसाठी ओमी कलानी यांना तिकीट मिळण्यासाठी पप्पू कलानी कुटुंबाने शरद पवार यांच्या दरबारी भेट घेतली असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात माजी आमदार पप्पू कलानी, टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

ओमी कालानी हे पहिल्यांदाच आमदारकीच्या निवडणुकीत उतरणार असून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पसंती दर्शवलेली आहे.त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागणार असल्याचे ओमी यांनी जाहीर केले होते. विशेष म्हणजे ही निवडणूक जिंकायचीच या ठाम निश्चयाने ओमी कलानी यांनी जुलै महिन्यात थेट गोव्यामध्ये बैठकीचे आयोजन करून कोअर कमिटीची घोषणा केलेली आहे.

त्यात अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, मार्गदर्शक पप्पू कलानी, पदाधिकारी नरेंद्र कुमारी ठाकुर, सुमित चक्रवर्ती, पीतू राजवानी, नोनी धामेजा, नरेश दुर्गानी, ओमी कालानी, संजय सिंह चाचा, सत्यन पूरी, राजेश टेकचंदानी, अजीत माखीजानी, मनोज लासी, शिवाजी रगडे, ऍडवोकेट मनीष वाधवा, मोनू सिद्दीक़ी, संतोष पांडे, पंचम ओमी कालानी, कमलेश निकम, कार्यालय प्रमुख आनंद शिंदे, होशियार सिंह लबाना यांचा समावेश आहे.

पप्पू कालानी आणि त्यांचे कुटुंब हे उल्हासनगरसाठी समीकरण असून पप्पू कालानी यांनी चारदा, स्वर्गीय ज्योती कालानी यांनी एकदा आमदार पद भूषविले आहे. यावेळेस ओमी कालानी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून पप्पू कालानी हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

पप्पू कलानी जेलमधून बाहेर आल्यापासून ते हितचिंतकांच्या प्रत्येक कार्यक्रमात, सोहळ्यात सहभागी होऊन ओमी कलानी यांच्यासाठी वातावरण निर्मिती करू लागले आहेत. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार व पक्षाचे संभावित उमेदवार कुमार आयलानी यांना यंदा काटे की टक्कर सामना करावा लागणार आहे.

ओमी कलानी यांचे डिपॉझिट जप्त होणार असे कुमार आयलानी म्हणत असले तरी पप्पू कलानी यांनी वाढवलेली जनसंपर्काची खेळी ही टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. याच विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं आठवले गटाचे माजी शहराध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत (गंगोत्री) राजवानी, भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनीही कंबर कसली असून पक्षाने तिकीट दिले तर निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दर्शवली आहे. एकंदरीत येत्या काही कोणकोण उभे राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.