बदलापूर - काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या, ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरचे आशिष दामले यांची निवड करण्यात आली आहे.
आशिष दामले हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस या पदावर असून, त्यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीमुळे, एकंदरीत ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला अधिकचे बळ मिळणार आहे. त्यातच एवढ्या मोठ्या जबाबदारीचे पद ठाणे जिल्ह्यातील बदलापूर सारख्या शहरातील एका तरुण नेतृत्वाला मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, त्यांचे सगळ्या स्तरातून कौतुक केले जात आहे.