Central Railway : मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट! वाहतुकीतून ६७.७७ कोटी रुपयांची कमाई!

Central Railway
Central Railway
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेने गेल्या तीन महिन्यात प्रवासी भाडेव्यतिरीक्त २८.६२ कोटी आणि पार्सल महसूल ६७.७७ कोटीचे विक्रमी महसूल गोळा केला आहे. मध्य रेल्वेची नॉन-फेअर महसूल आणि पार्सल महसूलामध्ये उत्कृष्ट कामगिरी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Central Railway
Uday Samant:''भाकरीमध्ये वाटेकरी झाले पण... शिंदेंच्याच हातात खातेवाटप'', उदय सामंतांनी उद्भवलेल्या परिस्थितीवर दिलं स्पष्टीकरण

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून मध्य रेल्वेची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, विना-भाडे महसुलात २८.५२ कोटी रुपयांच्या विक्रमी महसूल मिळाला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १४. १० कोटी असून यंदा १०२. ३३ टक्यांनी महसूलात वाढ झाली आहे. निविदा बिडिंगच्या ई-लिलाव ऑनलाइन प्रणालीने एक दिवसात निविदा अंतिम करण्याच्या जलद प्रक्रियेमुळे नॉन-फेअर महसूलाच्या कमाईला मोठी चालना दिली आहे.

Central Railway
Rohit Pawar: 'तुम्हाला आपली निष्ठा गहाण....', पवारांची साथ सोडणाऱ्या नेत्यांना रोहित पवारांचा सवाल

याशिवाय पार्सल महसुलातही मध्य रेल्वेने विक्रमी कामगिरी केली आहे. एप्रिल ते जून पार्सल महसूलाद्वारे ६७. ७७ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. मागील वर्षीच्या एप्रिल ते जून २०२२ मध्ये ६४.६६ कोटी कमाई केली होती. मात्र, यंदा गेल्या वर्षी पेक्षा ४.९७ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात जून पर्यंत एकूण ९२ पार्सल वेळापत्रकानुसार धावल्या आहे. यापैकी २९ पार्सल ट्रेनच्या फेऱ्यातून ५.७८कोटी कमाई केली, इंडेंटेड पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन्सच्या (पीसीईटी) ५७ ट्रिपमधून ८.४५ कोटी कमावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.