मुंबईतील एका उच्चभ्रू शाळेतील मुलांच्या WhatsApp मधील ग्रुप चॅट समोर आलंय. हे संभाषण वाचून आई वडील आणि शाळा प्रशासन देखील चांगलंच हैराण झालंय. शाळेतील 13-14 वर्षीय विद्यार्थ्यांनी आपल्या चॅटमध्ये शाळेतील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलीयेत. फक्त आक्षेपार्ह विधानं नाही तर थेट रे#प सारख्या शब्दांचा उल्लेख देखील करण्यात आलाय.
या शाळेतील विद्यार्थिनींच्या आईंनी हे ग्रुप चॅट वाचलेत आणि त्यांना चांगलाच धक्का बसलाय. यानंतर लगेचे त्यांनी शाळेकडे याबाबत तक्रार दाखल केलीये. काही मुलींनी तर या भीतीने शाळेत जाणं देखील बंद केलंय.
महत्त्वाची बातमी : इंटरनेट बंद असेल तरी पाठवा फोटो मेसेज किंवा करा चॅटिंग, कसं...
चार वेळा रे#प या शब्दाचा उच्चार
नोव्हेंबर 8 ते 30 नोव्हेंबर या तारखांमधील 'ग्रुप चॅट'मध्ये वर्गातील विद्यार्थिनीच्या सोबत 'एक रात्र घालवायची आहे' असा उल्लेख करण्यात आलेला. ज्याला बाकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देखील दिलाय. यामध्ये विद्यार्थिनींच्या बाबत अत्यंत आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आलाय. अनेक ठिकाणी अनेक अश्लाघ्य शब्द देखील वापरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी शिव्यांचा देखील वापर झालाय. संपूर्ण संभाषणात 'रे#प या शब्दाचा चारदा वापर करण्यात आलाय.
महत्त्वाची बातमी : धक्कादायक ! देशात प्रत्येक 1456 रुग्णांसाठी फक्त एक डॉक्टर..
विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार
या व्यतिरिक्त समलैंगिकता आणि त्याबद्दलची भीती देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीये. कुणाला गे तर कुणाला लेस्बियन म्हणून टर उडवली गेलीये. आम्हाला शाळेबद्दल विशास आहे, याबाबत शाळा प्रशासन योग्य ती कारवाई करेल असं काही पालकांनी सांगितलंय. पालकांच्या मते सर्व विद्यार्थ्याच्या समुपदेशनाची गरज आहे.
Webtitle : parents are shocked to after seeing their kids whatsapp group chat
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.