शाळांच्या भरमसाठ फी आकारणीविरोधात पालक थेट न्यायालयात; वाचा संपुर्ण प्रकरण

शाळांच्या भरमसाठ फी आकारणीविरोधात पालक थेट न्यायालयात; वाचा संपुर्ण प्रकरण
Updated on


मुंबई : कोरोना साथीमध्ये ऑनलाईन शाळा सुरू झाल्या असल्या तरीदेखील शाळा व्यवस्थापनाकडून केल्या जाणाऱ्या भरमसाठ शुल्क आकारणीला लगाम लावा, अशी मागणी आता पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये जारी केलेल्या खासगी शाळांवरील फी वाढीला मनाई करणारा अध्यादेश जारी केला होता. मात्र या निर्णयाविरोधात काही शाळा चालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जुनमध्ये याचिका सुनावणीसाठी मंजूर केल्या आणि संबंधित निर्णयाला स्धगिती दिली आहे. मात्र ही स्थगिती हटविण्यासाठी तीस पालकांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यापैकी काही पालकांची मुले युनिवर्सल आणि गरोडिया शाळेतील आहेत.

याचिकेवर सोमवारी न्यायालयात व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या उज्जल भूयान आणि न्या अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने शाळा संघटनेसह अन्य प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 20 रोजी होणार आहे. मागील वर्षी जी फि होती तीच ठेवावी आणि पालकांना हप्त्यात फि भरण्याची मुभा द्यावी, असे पालकांचे मागणी आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.