परीक्षा निर्धारित वेळेतच घ्याव्यात; पालकांचा आंदोलनाचा पवित्रा

strike
strike Sakal media
Updated on

ठाणे : शिक्षण विभागाच्या माध्यमातून (Education Department) काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत, माध्यमिक शाळा समूहांतर्गत येणाऱ्या शाळांनी आडमुठी भूमिका घेत, परीक्षा लांबणीवर (exam Postpones issue) गेल्या आहेत. त्याविरोधात पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले असून पालकांनी शाळासमूहाच्या विरोधात आंदोलन (strike) करण्याचा पावित्रा घेतला आहे. 18 एप्रिलपर्यत शाळांनी परीक्षा संपवाव्यात या पालकांच्या मागणीचा शाळांनी विचार करावा अशी भूमिका पालकांनी घेतलेली आहे.

strike
अनिल देखमुखांना सीबीआय कोठडी; चौकशीसाठी दिल्लीला नेणार?

माध्यमिक शाळा समूह म्हणजे शिक्षकांची संघटना झाली असल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, अशा शाळांनी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात असे म्हटले आहे. परंतु माध्यमिक शाळा समूहांनी विद्यार्थी व पालकांना वेठीस धरले आहे.

तसेच अनेक शाळांच्या शिक्षकांमध्ये देखील परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. शाळांच्या परीक्षांबाबतचा मुद्दा गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. परंतु त्याची कोणतीही दखल शाळा समूह घेत नसल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या शाळा समूहातंर्गत असलेल्या शाळांना स्वत:चे अधिकार नाहीत का? मग मुख्याध्यापकांचा काय उपयोग असाही सवाल पालक करीत आहे. ठाण्यातील मराठी माध्यमाच्या सरस्वती विदया मंदिरने देखील आपले नियोजित परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

strike
पनवेलचे गतिरोधक अपघात प्रवण क्षेत्र! प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

तर कळव्यातील इंग्रजी माध्यमाच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाने देखील सुरू असलेली परीक्षा एप्रिलचा तिसरा आठवडा गाठण्यासाठी पुढे ढकलली आहे, या सर्वाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार माध्यमिक शाळा समूह करीत नसल्याचे देखील पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, जर परीक्षा जर 18 एप्रिलपर्यत शाळांनी संपविल्या नाहीत तर पालक हा शाळा समूह बंद करण्यासाठी आंदोलन करतील असा इशारा पालकांनी दिला आहे. तसेच माध्यमिक शाळा समूह हा आपली मक्तेदारी असल्याचा समज त्यांनी करुन घेतला असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

माध्यमिक विभागाच्या शाळा समूहांकडून शासनाच्या परिपत्रकाचा गैरवापर होत आहे. तसेच या शाळा समूह पालकांशी खेळत आहे. आधीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पालकांनी नियोजन केले होते. मात्र, शाळा समूह प्रशासनाने घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे. जर नियोजित वेळेत परिक्ष न घेतल्यास पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

- नरेश म्हस्के, माजी महापौर, ठामपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.