कोरोनामुळे सील केलेल्या इमारतीत तो राहिला एकटाच..

parrot
parrot
Updated on

मुंबई ः भांडूप येथे एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना उपचारासाठी पालिका प्रशासनाने रुग्णालयात हलविले. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने संपूर्ण इमारत सील केली. इमारतीतील रहिवाशांची निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्या इमारतीतील एका घरात एकजण अडकून पडला होता. घरात कोणीच नसल्याने तो सातत्याने आवाज करत असल्याने शेजाऱ्यांचे लक्ष गेले. शेजाऱ्यांनी प्रशासनाला त्याबाबत माहिती देऊन त्याची सुटका केली. सुटका केलेली कोणी व्यक्ती नसून तो पाळलेला पोपट होता.

भांडूप येथील खिंडीपाडा येथे एका कुटूंबात कोरोना व्हायरसचा बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णास पालिका प्रशासनाने उपचारासाठी मुंबईतील पवई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचे घर मुंबई महापालिकेने तीन दिवस सील केले आहे. घरात कोणीही नजरेस पडत नसल्याने घरातील पोपट सतत आवाज करीत होता. ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरीत पॉझ संस्थेचे सुनिष सुब्रमण्यन यांना घरात पोपट अडकला असल्याची माहिती दिली. सुनिष यांनी ठाणे येथील वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधत त्यांना या घटनेची माहिती दिली.

त्यानुसार मुंबई महापालिकेचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, पॉझचे सुनिष सुब्रमण्यन व वन विभागाचे कर्मचारी, शीध्र बचाव दल, वनरक्षक आदिंनी घटनास्थळी जाऊन घराचे कुलूप तोडून आत असलेल्या पिंजऱ्यातील पोपटाची सुखरुप सुटका केली. या पोपटास परेल येथील एसपीसीए मध्ये उपचार व देखभालीसाठी दाखल करण्यात आले असल्याचे संतोष भागणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.