पहाटेच्या सुमारास ठाण्यात कोसळला इमारतीचा भाग

यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही.
पहाटेच्या सुमारास ठाण्यात कोसळला इमारतीचा भाग
file photo
Updated on

मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात इमारती कोसळण्याच्या (building collapsed) घटना घडतात. जुन्या-जर्जर झालेल्या या इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागते. दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होता. काही वेळा पालिका किंवा अन्य यंत्रणांकडून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पाठवल्या जातात. पण पर्यायी जागेची व्यवस्था नसल्यामुळे किंवा दिलेली जागा राहण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्याच धोकादायक इमारतींमध्ये राहतात. (Part of a building collapsed in Thane West area)

मग अचानक एकदिवस इमारत कोसळल्याची बातमी येते. यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यानंतर मग त्यावरुन जोरदार राजकारण सुरु होतं. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होता. पालिका, राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. मालाड मालवणी इमारत दुर्घटनेमध्ये हे दिसून आलं.

पहाटेच्या सुमारास ठाण्यात कोसळला इमारतीचा भाग
Lockdown Effect: मुंबईत फेरीवाला बनला ड्रग्ज तस्कर

मालवणी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहीसरमध्ये घर कोसळण्याची दुर्घटना घडली. काल रात्री मुलुंड पश्चिम येथे पावसामुळे एक भिंत कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृ्त्यू झाला आहे. दिलीप वर्मा (वय ३५) असं अंगावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटे ठाणे पश्चिमेला असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. पण यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()