Mumbai Crime: प्रवाशाने चाकूचा धाक दाखवत ओला कार चालकास लुटले

चाकूचा धाक दाखवत प्रवाशाने कार चालकास लुटल्याची घटना घडली आहे.
mumbai
mumbaisakal
Updated on

डोंबिवली - ठाणे येथून कल्याणच्या दिशेने ओला कार चालक भाडे घेऊन निघाला. कल्याण पश्चिमेला रामबाग परिसरात येताच प्रवाशाने कार बाजूला घेण्यास सांगत चालकाच्या गळ्याला थेट चाकू लावला.

चाकूचा धाक दाखवत प्रवाशाने कार चालकास लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात लुटमार करणाऱ्या अज्ञात प्रवाशावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमितकुमार अनिलकुमार गुप्ता (वय 32) हा नवीमुंबई भागातील घणसोली येथे कुटूंबासह राहत असून तो ओला टॅक्सी चालक आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चालक अमितकुमार हा ठाणे शहरात असताना त्याला ठाणे ते कल्याण येण्यासाठी प्रवाशी भाडे असल्याचा मोबाईलवर मॅसेज आला होता.

mumbai
Kalyan Politics : शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडी सुरूच; मंत्री चव्हाणांनी शिवसेना प्रमुखांना सुनावले खडेबोल

ठरल्याप्रमाणे ओला चालक हा अज्ञात प्रवाशाला घेऊन ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येत होता. त्याच सुमारास दुपारी अडीज वाजल्याच्या सुमारास ओला कार कल्याण पश्चिम भागातील रामबाग झिरो नंबर गल्लीतील एका बेकरी जवळ येताच, कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने साईटला कार घेण्यास ओला चालक अमितकुमारला सांगितले.

mumbai
Thane Rain Update : ठाणे जिल्ह्याला दिलासा! बारवी धरण 56 टक्के भरले; एकाच दिवसात 275 मिमी पाऊस

त्यामुळे कार साईटला घेत असतानाच त्या प्रवाशाने कमरेला असलेला धारदार चाकू काढला. आणि कारमध्येच एका हाताने अमितकुमारच्या गळ्याला मागून घट्ट पकडून दुसऱ्या हाताने चाकू गळ्याला लावला.

अचानक घडलेल्या घटनेमुळे चालक भयभीत होऊन त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रवाशाने शिविगाळ करत चाकूने ठार मारण्याची धमकी देऊन रोकडची मागणी केली. त्यानंतर त्याच्या धमकीला घाबरून चालकाने स्वतः जवळील सात हजराची रोकड त्या प्रवाशाला दिली. मात्र प्रवाशाला आणखी रोकड पाहिजे असल्याने त्याने पुन्हा धमकी देऊन चालक अमितकुमारच्या मोबाईल फोन मधून गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करत तो प्रवासी फरार झाला.

या घटनेनंतर ओला कार चालकाने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठत अज्ञात प्रवाशा विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.