मुंबई : वित्त व्यवस्थेचा पाया असलेल्या पतपेढ्यांचे अर्थकरण डगमगू लागले आहे. कर्जाची वसुली 5 ते 10 टक्के होत असताना खर्च कमी झालेला नाही. त्यामुळे या पतपेढ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
हातावर पोट घेऊन जगणारा समाज हा पुर्णपणे पतपेढ्यांवर अवलंबून आहे. मुंबईत 2 हजार 500 च्या आसपास पतपेढ्या आहेत. तर 25 लाखाच्या आसपास सभासद आहे. मुंबईतील पतपेढ्यांची वर्षाला 4 ते 5 हजार कोंटींचे उलाढाल आहे.रिक्षा चालक, मालक, फेरीवाले, लहान मोठे दुकानदार, लहान मोठे व्यापारी या पतपेढ्यांचे सभासद आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात यांचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत.
सरकारच्या निर्णयानुसार कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा दिली आहे.ज्या कर्जदारांनी ही सुविधा घेतली नाही त्यांना हप्त्यांसाठी फोन केल्यावर गावी आहे, लॉकडाऊनमुळे पैसे नाहीत असे सांगितले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर तरी कोठे बळजबरी करणार. त्यामुळे 5 ते 10 टक्के कर्जाची वसुली होते.अशी माहिती घाटकोपर मधील एका पतपेढी संचालकाने दिली. याचा परीणाम आता नाही पण पुढील वर्षाच्या डिव्हीडंड वर होईल. असेही ते नमुद करतात.
पतपेढ्या 10 ते 15 टक्क्यांवर समभाग धारकांना डिव्हीडंड देतात. या वर्षीचा डिव्हीडंड मंजूर झाला आहे. त्याच्यावर कोणताही परीणाम होणार नाही. पण, पुढल्या आर्थिक वर्षात डिव्हीडंड देणे अवघड होईल. काही लहान पतपेढ्यांवर याचा जास्त परीणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पतसंस्थांमधील सर्वच व्यवहार ठप्प पडले आहेत. क्वचितच कर्जदार हप्ते भरण्यासाठी पतपेढ्यांमध्ये येतात. नवे कर्जदार येत नाही नवे ठेवीदारही येत नाही. त्याच नियमित खर्च करावाचा करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यातील व्यवहारांवर याचा परीणाम होईल.
-शिवाजीराव नलावडे,अध्यक्ष मुंबई नागरी पतसंस्था फेडरेशन
नवे कर्जदार सापडणे अवघड
कर्जदार हा कोणत्याही वित्तसंस्थेचा पाया असतो. त्यात पतसंस्थांचे कर्जदार हे लहान मोठे व्यावसायिक रिक्षा टॅक्सीवाले आहे. नवे वाहान घेण्यासाठी रिक्षा टॅक्सीवाले कर्ज घेतात.तसेच, लहान मोठ्या व्यवसाय वाढवायचा असल्यास सणावारला जादा साहीत्य घ्यायचे असल्यास फेरीवाले,व्यापारी लहान मोठे कर्ज घेतात.मात्र,येत्या काळात लहान मोठ्या व्यवसायांचा विस्तार करणेच अवघड आहे.त्यामुळे नवे कर्जदार मिळणेही कठीण असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
--------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.