मुंबई : पवई तलावात (pawai lake) उगवलेल्या वनस्पती (tree plants) नष्ट करण्यासाठी ग्लायफोसेट तणनाशकासारख्या विषारी रसायनांची (toxic chemicals) फवारणी सुरू होती. मात्र तलावात मगरी (crocodile) आणि अन्य प्राणी असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही फवारणी बंद करण्यास सांगितले असून फवारणीमुळे तलावातील जीव जंतूंच्या आरोग्यावर (impact on health) काही दुष्परिणाम होऊ शकतो का ? याचा अभ्यास केला जाणार आहे.
तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असून दरवर्षी तलाव स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात.शिवाय तलावामध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या तयारीचा भाग म्हणून तलावाच्या सीमांवरील जागा स्वच्छ केल्या जात आहेत. मात्र तलाव स्वच्छ करताना केवळ त्यावर उगवलेल्या वनस्पती काढल्या जातात.पण गाळ उपसला जात नाही असे वनशक्ती या पर्यावरण संस्थेचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले.
यंदा ही झाडे हाताने काढण्या ऐवजी पालिकेकडून तलावातील वनस्पतींवर तणनाशक फवारणी केली जात होती. मात्र त्यामुळे तलावातील मगरी तसेच अन्य प्राण्यांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे स्टॅलिन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या तक्रारीची दखल घेत तलावात असलेल्या मगरी आणि अन्य प्राण्यांमुळे असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही फवारणी बंद करण्यास सांगितले असून त्यामुळे या प्राण्यांच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो का याचा अभ्यास केला जाणार आहे असेही मंडळाने नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.