नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, हे रेल्वे फाटक लवकरच होणार बंद
Diva Panvel Railway: sakal

Diva Panvel Railway: नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, हे रेल्वे फाटक लवकरच होणार बंद

Published on

Khargar News: दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील तळोजा पेंधर येथील रेल्वे ट्रॅकवर गर्डर टाकण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी उड्डाणपूल, तसेच रेल्वे मार्गिकेची पाहणी केली.


तळोजा फेज दोन वसाहतीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी पेंधर रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिडकोने दिवा- पनवेल मार्गांवरील रेल्वे ट्रॅकवर २०१२ साली उड्डाणपूल उभारणीच्या कामाला सुरुवात केली.

या पुलाचे काम करताना असंपादित जमिनीचा वाद निर्माण झाल्यामुळे जवळपास आठ वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते.

हा वाद निकाली निघाल्याने सिडकोने रखडलेल्या पेंधर पुलाचे काम सुरू केले. पनवेल-मुंब्रा महामार्गावर सिमेंटची ग्रेडर उभारणीचे काम वेगात सुरू आहे. दिवा-पनवेल रेल्वे ट्रॅकवर ३७ मीटरचा लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोने रेल्वेच्या सीएसआर विभाग आणि एमएमआरडीए विभागाकडे पत्रव्यवहार करून परवानगी मिळवली आहे.या पुलाचे काम करताना असंपादित जमिनीचा वाद निर्माण झाल्यामुळे जवळपास आठ वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते.

हा वाद निकाली निघाल्याने सिडकोने रखडलेल्या पेंधर पुलाचे काम सुरू केले. पनवेल-मुंब्रा महामार्गावर सिमेंटची ग्रेडर उभारणीचे काम वेगात सुरू आहे. दिवा-पनवेल रेल्वे ट्रॅकवर ३७ मीटरचा लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोने रेल्वेच्या सीएसआर विभाग आणि एमएमआरडीए विभागाकडे पत्रव्यवहार करून परवानगी मिळवली आहे.

ब्लॉकसाठीची चाचपणी


पेंधर उड्डाणपूल आणि रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वाय. पी. सिंग, पनवेल रेल्वे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण मेहता यांनी पाहणी केली. मे अखेर अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ब्लॉक मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.