Kalyan: पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही; मनसेचा सरकारला ईशारा

MNS For Students: अनुदानित पेंढरकर कॉलेज बंद करण्यासाठी स्वायत्तता दिलेली नाही कॉलेज बंद होऊ देणार नाही
Kalyan: पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही; मनसेचा सरकारला ईशारा
Kalyan:sakal

Dombivli: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही.

कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे.

Kalyan: पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही; मनसेचा सरकारला ईशारा
Dombivli Accident: भरधाव टेम्पोने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, जागी झाला मृत्यू, सात ते आठ गाड्यांचे नुकसान

डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली.

Kalyan: पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही; मनसेचा सरकारला ईशारा
Dombivli MIDC Fire: 'तीन स्कूल व्हॅन जळून खाक, हाकेच्या अंतरावर शाळा'; प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षकाने काय पाहिलं?

यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे.

कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.

Kalyan: पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही; मनसेचा सरकारला ईशारा
Dombivli Blast: डोंबिवलीमध्ये सरकारची आश्वासने आगीत जळाली, पंधरा दिवसांपूर्वी काय म्हणाले होते मुख्यमंत्री, उद्योगमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com