भाऊ, ताई, मुंबईत कोरोना संपला का ? मग असं का बरं वागताय?
मुंबई : मुंबईत लोक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता घराबाहेर फिरत आहेत. कोरोना संपला अशी धारणा अनेक लोकांची झाल्याचे दिसते. कोरोना आटोक्यात आला असे कोणत्याही संघटनेने सांगितलेले नाही. त्यामुळे कोरोनाबद्दल चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे टाळायला हवे. अश्याने आजाराला निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
देशभरात कोरोना संसर्ग वेगाने पसरतोय. कोरोना रुग्ण वाढत भारत अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. पालिकेने पावले उचलल्यामुळे रुग्णसंख्या काहीशी कमी झाली आहे. मात्र अनलोक झाल्यानंतरही काही कंटेन्मेंटझोनमध्ये लॉकडाऊन ठेवण्यात आले. मात्र अनलॉक झालेल्या ठिकाणी लोक जणू काही कोरोना संपला अशा आवेशात फिरू लागले आहेत.
सध्या कोरोना संपल्याच्या आणि लक्षणे सौम्य झाल्याच्या चर्चा आहेत. दादर, भायखळा मंडईसह अन्य ठिकाणीही पदपथावर दुकाने थाटली आहेत. सध्या रुग्णाच्या खोकल्यातून चारही बाजूला शिंका आणि खोकल्यातून ड्रॉपलेट्स पसरू शकतात. हवेतून लांबपर्यंत पोहचू शकतात आणि वजनाने हलके असल्याने तीन तास हवेत तरंगूही शकतात. इतकेच नाही तर विषाणू 25 फूट उंचीपर्यंत राहू शकतात असे संशोधनातून समोर आहे. त्यामुळे सरकारच्या सूचना नियम, दंडाची तरतूद असूनही नागरिक काळजी घेत नसतील तर कोरोना वाढू शकतो असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले असता, कुठल्याही देशाने, राज्याने, संस्थेने किंवा ऑर्गनायझेशनने कोरोना संपल्याची माहिती दिलेली नाही असे त्यांनी सांगितले. सध्या कोरोना वाढत असून तो संपल्याच्या अफवा नागरिकांकडून पसरविल्या जात आहेत असून हे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचे ही ते म्हणाले.
ज्यावेळी नवीन रुग्णांची संख्या,रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत दोन ते तीन आठवडे वाढ होईल तेव्हा कोरोना काहीसा आटोक्यात आला आहे असे म्हणता येईल. तसेच सलग एक महिना एकही नवीन रुग्ण न सापडल्यास कोरोना पूर्णतः आटोक्यात आला किंवा संपला असे म्हणता येईल असे डॉ. भोंडवे सांगतात.
कोरोनाबाधित रुग्ण हे तीन टप्प्यात मिळत आहेत. 70 टक्के रुग्ण हे बाधित असून लक्षणे विरहित आहेत. तर 10 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र अजुनही 20 टक्के रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. त्यामुळे जर सरकार देत असलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करत नसाल तर तुम्ही कोणत्या टप्प्यात जाल हे सांगणे शक्य नाही. कोरोनाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नियमांचे पालन करण्याचा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला.
सध्याची औषधे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असून ती रुग्णांना पूर्ण बरी करणारी नसली तरी कोरोनावर परिणाम कारक ठरली आहेत. त्यामुळे रुगसंख्या आटोक्यात आली आहे. तरीही अजूनही बरेच रुग्ण हे व्हेंटिलेटरवर वर आहेत. तसेच शहरात बरे झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी होत आहे.
दरम्यान, सप्टेंबर/ऑक्टोबर दरम्यान रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळी वातावरण, अनलॉकिंग आणि गणेशोत्सवातील उत्सवासाठीची संभाव्य गर्दीचा अभ्यास करता रुग्णसंख्या वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 3 ते 4 महिन्याच्या लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे अनलॉक करण्यात आले. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे. तसेच अन्य नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर जाणे टाळणे गरजेचे आहे.
( संकलन - सुमित बागुल )
people are roming without mask as if corona is gone from mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.