Koli Community : दर्याचा राजा निघाला देवदर्शनाला..; मच्छीमारी बंद असल्याने कोळी बांधवांची पर्यटनाला पसंती

कोळी समाज हा देवभोळा समाज म्हणून ओळखला जातो. मच्छीमारी बंद असल्याने हा समाज आपल्या कुटुंबाबरोबर देवदर्शनासाठी, तसेच पर्यटनासाठी बाहेर पडला आहे.
Koli Community
Koli Communityesakal
Updated on
Summary

समुद्रावर जाणारा आपला नवरा, मुलगा, भाऊ, सासरा, दिर यांना वादळ वाऱ्यातून सुखरूप घरी आणण्यासाठी कोळी भगिनी देवाला साकडे घालत आहेत.

विरार : कोळी बांधव (Koli Community) सध्या मच्छीमारी बंद असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला निघाला आहे. तर, काही जण देशाबरोबरच प्रदेशात पर्यटनाला जाण्याला पसंती देत आहेत. १ जूनला मासेमारी बंद झाल्यानंतर मच्छीमार (Fishing) समाज पुढचे दोन महिने तसा मोकळा असतो. या काळात बोटीची दुरुस्ती, जाळी शिवणे आणि इतर कामे करण्यास सुरुवात केली आहे.

कोळी समाज हा देवभोळा समाज म्हणून ओळखला जातो. मच्छीमारी बंद असल्याने हा समाज आपल्या कुटुंबाबरोबर देवदर्शनासाठी, तसेच पर्यटनासाठी बाहेर पडला आहे. यामध्ये हिंदू समाजातील (Hindu Community) वसई तालुक्यातील मच्छीमार हे पंढरपूरच्या वारीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखी बरोबर चालत जात असतात. त्याच बरोबर या समाजातील लोक चारधाम यात्रा, एकविरा देवी, तुळजा भवानी, जेजुरी, अमरनाथ याठिकाणी देवदर्शनासाठी निघाला आहे.

Koli Community
'मी पायानं अपंग असलो, तरी मराठा आरक्षण मिळणं महत्त्वाचं'; पोलिसांनी गाड्या अडविल्याने अपंगांची 3 किलो मीटरपर्यंत कसरत

समुद्रावर जाणारा आपला नवरा, मुलगा, भाऊ, सासरा, दिर यांना वादळ वाऱ्यातून सुखरूप घरी आणण्यासाठी कोळी भगिनी देवाला साकडे घालत आहेत. देवदर्शन घेऊन पुन्हा मच्छीमारीसाठी हे कोळी बांधव ताजेतवाने होताना दिसत आहेत. आषाडी झाली की, श्रावण सुरु होतो त्याकाळात प्रत्येक कोळीवाड्यातून हरिनामाचा गजर ऐकू येऊ लागतो. या काळात रामकृष्ण हरी आणि ज्ञानेश्वर माउलींच्या नाम सप्ताहात हा समाज तल्लीन होऊन जातो आणि आपली दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असतो.

Koli Community
Ambabai Temple : करवीर निवासिनी अंबाबाई चरणी तब्बल दीड कोटीहून अधिक दान; पैसे, दागिन्यांसह परकीय चलनाचा समावेश

वर्षातील जवळपास १० महिने समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या आमच्या समाजातील लोकांना दोन महिने मच्छीमारी बंद असल्याने सुट्टी मिळत असते. त्यावेळी आपल्या कुटुंबाला घेऊन देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक बाहेर पडतात. याकाळात एका बाजूला देवदर्शन तर दुसऱ्या बाजूला पर्यटन करून पुन्हा एकदा समुद्रात मच्छीमारीसाठी ताजेतवाने होत आहेत. समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. म्हणून, या सुट्टीचा ते उपयोग करून घेत असतात.

-निवृत्ती घुसेकर, माजी सरपंच, नायगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.