खारघर : पनवेल महापालिकेकडून (Panvel Municipal corporation) पाच वर्षात कोणत्याही प्रकारचे विकासकामे न करता, चौपट मालमत्ता कराची नोटीस (property tax notice) पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून, सेवा नाही तर कर नाही, वाढीत मालमत्ता कर रद्द करण्यात यावा तसेच महापालिका क्षेत्रातील २९ गावे (twenty nine villages) वगळण्यात यावीत, आदी मागण्यासाठी शुक्रवार (ता. ११) खारघर ते पनवेल महापालिकेवर (strike) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे.
ऑक्टोबर २०१६ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यावर गावांना ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर आकारले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारची सेवा न देता अवाच्यासवा मालमत्ता कर आकारल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.
खारघर शहरातील बहुतांश भूखंड सिडकोने भाडेतत्त्वाने दिले आहेत.
त्यामुळे सिडकोकडून मालमत्ता कर घेण्यात यावा या आणि इतर मागण्यांसाठी नवी मुंबई ९५ गावे नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने काढण्यात येणार आहे. मोर्चा सकाळी नऊ वाजता खारघर हिरानंदानी येथून निघेल. मालमत्ता कराला विरोध करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.