मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगात वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसपासून होणारा COVID-19 हा रोग एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो हे स्पष्ट झालंय. त्यामुळे संपूर्ण जगात सोशल डिस्टंसिंगचा मंत्र पाळण्यात येतोय. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लोक एकमेकांना हात मिळवायला आणि मिठी मारायला सुद्धा मागेपुढे बघतायेत. यावरूनच तज्ज्ञांनी एक अजब शक्यता दर्शवली आहे.
जगातल्या सर्वच देशांमध्ये एकमेकांना मिठी मारून किंवा हात मिळवून अभिवादन करण्याची पद्धत आहे. मात्र कोरोना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होतो हे स्पष्ट झाल्यापासून ही पद्धत कमी होताना दिसतेय. एकप्रकारे लोकं हात न मिळवण्याचं किंवा मिठी न मारण्याचं पथ्य पाळायला लागले आहेत.
ब्रिटनच्या नॉटिंघम ट्रेंट यूनिवर्सिटीमध्ये समाज विज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या रॉबर्ट डिंगवॉल यांच्या म्हणण्यानुसार,कोरोना व्हायरस जगातून नाहीसा झाल्यानंतर लोकांच्या स्वभावात आणि सामाजिक परिस्थिती महत्वाचे बदल होऊ शकतात. तसंच लोकांच्या काही नेहमीच्या सवयींमध्येही बदल होऊ शकतात. या सामाजिक आणि सामुदायिक दुराव्याचा लोकांच्या जीवनावर असर होऊ शकतो.
आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याकडे बघता पुढील ५ वर्ष लोकं एकमेकांसोबत हात मिळवणार नाहीत किंवा एकमेकांना मिठी मारणार नाहीत. लोकांमध्ये काळजी घेण्याची एक सवय निर्माण झाली आहे. जी सवय लवकर जाणार नाही.
एका आकडेवारीनुसार अमेरिकेत ९० टक्के लोक हात मिळवून अभिवादन करण्यापेक्षा एकमेकांना स्मितहास्यानं अभिवादन करतायेत. तर तरुणांमध्येही तब्बल ५० टक्के तरुण वर्ग एकमेकांना मिठी मारून अभिवादन करण्यापेक्षा 'हॅलो' म्हणतोय. मात्र एकमेकांच्या स्पर्शानं संबंध अधिक दृढ होतात, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे येत्या काळात सामाजिक दुरावा निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
people will not shake hands and hug each other due to habit of social distancing says scientist
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.