एल्गार परिषद प्रकरण : स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी!

फादर मस्कारेन्हास यांची उच्च न्यायालयात याचिका
Father stan swamy
Father stan swamysakal media
Updated on

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar Parishad case) दिवंगत आरोपी फादर स्टॅन स्वामी (Stan swamy death investigation) यांच्या कारागृहात झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची आणि या प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्याची मागणी करणारी याचिका (petition) स्वामी यांचे निकटवर्तीय फादर फ्रेझर मस्कारेन्हास यांनी (Mumbai high court) मुंबई उच्च न्यायालयात केली.

Father stan swamy
मुंबईत 48 तसात एक प्रवासी ओमिक्रॉन बाधित

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असलेले मस्कारेन्हास यांनी ही याचिका केली आहे. स्वामी यांच्याविरोधात खूप गंभीर आरोप एनआयएने केले आहेत. विशेष न्यायालयानेही त्यांच्या दोन आदेशांमध्ये स्वामी यांच्यावर ठपका ठेवला आहे. स्वामी यांच्याविरोधातील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य दिसत आहे, असे मत विशेष न्यायालयाने व्यक्त केले आहे. २२ ऑक्टोबर २०२० आणि २२ मार्च या तारखेला दिलेल्या आदेशात न्यायालयाने हे मत नोंदवत जामीन नाकारला होता. त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते; मात्र तेथे त्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांना होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

विशेष न्यायालयाने ओढलेल्या शेऱ्यांवर न्यायालयात सुनावणी घ्यावी आणि ते वगळावे, अशी मागणी मस्कारेन्हास यांनी याचिकेत केली एखादा आरोपी खटल्यात हजर होत नाही, तोपर्यंत त्याला दोषी ठरवता येत नाही, असा दावा मस्कारेन्हास यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचे दाखले त्यांनी दिले. स्वामी आता हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल झालेला नाही; तरीही न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांवर सुनावणी घ्यावी आणि निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. लवकरच याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आरोपमुक्त जाहीर करावे!

मंगळूरमध्ये एका उद्यानाला स्वामी यांचे नाव द्यायचे निश्चित केले होते; मात्र बजरंग दल आणि अन्य संघटनांनी त्याला विरोध केला होता. यामुळे आता न्यायालयाने खुलासा करावा आणि स्वामी यांना मृत्यूपश्चात कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना आरोपमुक्त जाहीर करावे, अशी मागणीही मस्कारेन्हास यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.