मुंबई - चीनमध्ये आणि जगभरातच महाभयंकर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवाय. एकट्या चीनमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय (सदर आकडेवारी अधिकृत नाही, ही माहिती लीक झालीये). अशातच या महाभयंकर व्हायरसमुळे त्याचा जागतिक व्यापारावर देखील परिणाम आता जाणवताना दिसतोय.
चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती पडलेल्या पाहायला मिळतायत. चीन हा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत असतो. अशात आता क्रूड ऑईलच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसात तब्ब्ल तीन रुपयांनी कमी झाले आहेत. येत्या काही दिवसात पेट्रोलचे भाव आणखीन कमी होतील असं जाणकारांकडून सांगितलं जातंय.
काल म्हणजेच सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ७७.७६ रुपये होतं तर डिझेल प्रतिलिटर ६८.१९ रुपये होतं. साधारण महिनाभरापासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत असल्याचं नोंदवलं गेलंय.
मोठी बातमी - दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक!
दरम्यान पेट्रोलियम पदार्थ देखील GST अर्थात वस्तू आणि सेवा करांमध्ये आणावेत अशी मागणी गेल्या काही काळापासून केली जातेय. अशात यासंदर्भातील निर्णय हा GST काउंसिल बैठकीतच घेतला जाऊ शकतो. यावर बोलताना भारताच्या अंतर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणालात, याबाबतचा निर्णय सर्वस्वी राज्यांवर अवलंबून आहे. सर्व राज्यांनी आणि GST काउंसिल याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकेल.
petrol diesel rates dropped due effect of coronavirus on global market
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.