Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना क्लीनचिट; मुंबई हायकोर्टानं नोंदवलेले दोन्ही FIR रद्द

फडणवीस गृहमंत्री असताना गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग प्रकरणं घडलं होतं, त्यात शुक्लांवर हे गुन्हे दाखल झाले होते.
Rashmi Shukla Phone Tapping Case
Rashmi Shukla Phone Tapping Caseesakal
Updated on

Mumbai News : IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन FIR हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना सरकारनं क्लीनचीट दिली आहे. फडणवीस गृहमंत्री असताना गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग प्रकरणं घडलं होतं, त्यात शुक्लांवर हे गुन्हे दाखल झाले होते. (Phone Tapping Case Clean Chit to Rashmi Shukla two FIR quashed in case)

Rashmi Shukla Phone Tapping Case
Uddhav Thackeray: "शासन आमच्या दारी आलं पण काहीही दिलं नाही"; शेतकऱ्यांनी ठाकरेंकडं मांडल्या व्यथा

पुण्यात आणि मुंबईत एफआयआर

सुत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. (Latest Marathi News)

Rashmi Shukla Phone Tapping Case
Vikram Lander 3D Images: विक्रम लँडरचे 3D फोटो आले समोर; खास चष्म्यातून पाहिल्यास चंद्रावरचा घेता येईल अनुभव

'या' नेत्यांचे झाले होतो फोन टॅप

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही FIR नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. (Marathi Tajya Batmya)

Rashmi Shukla Phone Tapping Case
Maratha Reservation: "मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही"; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

क्लोजर रिपोर्ट

दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()