कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा रायगड जिल्ह्यात लखलखाट

माळरानावर छायाचित्रण करताना हाैशी छायाचित्रकार
माळरानावर छायाचित्रण करताना हाैशी छायाचित्रकार
Updated on

रोहा : रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या प्रेमात देश-विदेशातील छायाचित्रकर पडले आहेत. समाजमाध्यमांमुळे जिल्ह्याची ख्याती सर्वदूर पसरल्याने ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून यंदा 10 हजारांपेक्षा अधिक निसर्गप्रेमी पाने, फुले, डोंगरदऱ्यांबरोबर वन्यजीव कॅमेऱ्यात बंद करून गेले आहेत. 

जिल्ह्यात रायगड किल्ल्यासह अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यांच्या जोडीला नद्या, समुद्रकिनारे, घनदाट वने, मोठी धरणे, नानविध पशू-पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छायाचित्रकारांना या ठिकाणांची भुरळ पडली आहे. 

इंटरनेटमुळे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जिल्ह्यातील सौंदर्य व्यापक प्रमाणात जगासमोर आले. त्यामुळे छायाचित्रकारांची संख्या वाढली आहे. हा जिल्हा मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. त्यामुळेही संख्या वाढत आहे, असे सांगण्यात येते. 

अलिबाग तालुक्‍यातील आक्षी किनाऱ्यावर प्रवाळ बेटाचे अस्तित्व आढळून आले आहे. त्यामुळे प्रवाळात आढळणारे जीव टिपण्यासाठी समुद्र छायाचित्रण करणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली आहे, असे मुंबईचे छायाचित्रकार तुषार पाटील यांनी सांगितले. 

कर्नाटक, गोव्यात आढळणारे जवळपास सर्वच पक्षी रायगडच्या घनदाट अरण्यात आढळतात. तेथे विविध प्राण्यांचे; तसेच बिबट्याचे अस्तित्वसुद्धा आढळून येते. समुद्रकिनारे असल्याने स्थलांतरित व स्थानिक समुद्रपक्षीसुद्धा येथे आढळून येतात. त्यांचे निरीक्षण आणि ते कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी छायाचित्रकार मोठ्या संख्येने येतात, असे पुण्यातील छायाचित्रकार सुधीर जोशी यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्यात 33 किल्ले आहेत. पाणथळ जागा, वने अशा सौंदर्याने ओतप्रोत जागा आहेत. त्यामुळे नववधू-वरांचे अशा ठिकाणी छायाचित्रण केले जाते. काही मॉडेलही येतात, असे नवी मुंबईतील छायाचित्रकार शरद पाटील यांनी सांगितले. 4 ते 5 वर्षांपासून इंटरनेट व समाजमाध्यमांवर विविध छायाचित्रे प्रकाशित होऊ लागल्याने छायाचित्रकार मोठ्या संख्येन जिल्ह्यात येऊ लागले असल्याचे मत माणगाव येथील वन्यजीव छायाचित्रकार शंतनु कुवेस्कर आणि पुण्यातील छायाचित्रकार सुधीर जोशी यांनी सांगितले. 

निसर्गसौंदर्यामुळे रायगड जिल्ह्याला अधिक पसंती आहे. वर्षभरात 10 हजारापेक्षा अधिक छायाचित्रकार जिल्ह्याला भेटी देतात. त्यामध्ये हौशी छायाचित्रकारांची संख्या अधिक आहे. 
- शिवम सरफळे, छायाचित्रकार, डोंबिवली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.