कल्याण जवळील पिसवली गावात भररस्त्यात मतदान ओळखपत्रांचा ढीग; मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू

कल्याण (Kalyan) पूर्वेतील पिसवली गावाच्या कमानीजवळ एक भरलेली पिशवी बुधवारी पडली असल्याचे नागरिकांना दिसले.
Voter ID card
Voter ID cardesakal
Updated on
Summary

एका पादचाऱ्याने या पिशवीत काय आहे हे पाहण्यासाठी ती पिशवी उघडली असता, त्यामध्ये निवडणूक मतदान ओळखपत्रे दिसली.

डोंबिवली : कल्याण जवळील पिसवली गावात रस्त्यावर मतदार ओळखपत्रांनी (Voter ID card) भरलेली एक गोणी फेकल्याचे बुधवारी आढळून आले आहे. यातील बहुतेक ओळखपत्रे ही कल्याण पूर्व भागातील नेतिवली, पिसवली, चक्कीनाका भागातील रहिवाशांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मानपाडा पोलिसांनी याचा अधिक तपास सुरू केला आहे.

कल्याण (Kalyan) पूर्वेतील पिसवली गावाच्या कमानीजवळ एक भरलेली पिशवी बुधवारी पडली असल्याचे नागरिकांना दिसले. सुरुवातीला शिळफाटा रस्त्यावरून धावणाऱ्या एखाद्या वाहनातून ही पिशवी पडली असल्याचे पादचाऱ्यांना वाटले. एका पादचाऱ्याने या पिशवीत काय आहे हे पाहण्यासाठी ती पिशवी उघडली असता, त्यामध्ये निवडणूक मतदान ओळखपत्रे दिसली.

Voter ID card
GST आयुक्तांच्या रिसॉर्टला वीजपुरवठ्यासाठी 51.86 लाख, आमदार पाटलांकडून शासकीय निधीचा गैरवापर; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

याची माहिती मानपाडा पोलिसांना (Manpada Police) मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन या मतदान ओळखपत्रांची सत्यता, ही ओळखपत्रे रस्त्यावर कोणी आणून फेकली? अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार ओळखपत्रांचा वापर झाला आहे का? त्या गोणीवर असलेला शिक्का या दिशेने तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.