Plastic News: मनपा प्रशासन आक्रमक; सहा टन प्लास्टिक केले जप्त!

Plastic
Plastic esakal
Updated on

Plastic News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकल प्लास्टिक विरोधातील वसई-विरार महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशानुसार, रविवारी (ता. ५) सकाळी महापालिका प्रभाग समिती ‘ड’मधील आचोळे येथील महावीर धाम सोसायटीत धडक कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वात सहा टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

Plastic
plastic use : प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वंध्यत्व येऊ शकतं, हे माहिती आहे का?

नालासोपारा-आचोळे येथील महावीर धाम सोसायटीतील गोदामात दुकान मालक विनोद माळी यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहायक आयुक्त सुकदेव दरवेशी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या दुकानाची पाहणी केली.

अधिकच्या तपासणीत २३५ मोठ्या पिशव्यांत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, चमचे इत्यादी साहित्य आढळले. बाजारात या प्लास्टिकची सुमारे किंमत आठ लाख रुपये आहे. रीतसर पंचनामा केल्यानंतर हे प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय दुकान मालक विनोद माळी यांच्याकडून १० हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.

विशेष म्हणजे याआधीही या दुकानावर प्लास्टिक जप्ती कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही दुकान मालक माळी यांच्या माध्यमातून प्रतिबंधित प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू होती, अशी माहिती सहायक आयुक्तांनी दिली. महापालिकेने एकल प्लास्टिकविरोधातील मोहीम तीव्र केल्यानंतर, सुकदेव दरवेशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली ही सलग चौथी कारवाई आहे. या कारवाईतही पालिकेने लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त केले आहे.

Plastic
Plastic Ban Campaign : चाळीसगावला आजपासून प्लास्टिकबंदी मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.