Bharat Bandh | भारत बंदमुळे महामुंबईच्या प्रवाशांचे हाल

Bharat Bandh | भारत बंदमुळे महामुंबईच्या प्रवाशांचे हाल
Updated on

कल्याण  - भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील रस्त्यावर रिक्षा युनियनच्या एका पदाधिकाऱ्यांने हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना दमदाटी देऊन पळवून लावल्याने काही क्षणात तो परिसर खाली झाला , मात्र मेल गाड्यांनी गावावरून आलेल्या प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सी न मिळाल्याने प्रवाश्यांचे चांगलेच हाल झाले .

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायदा अन्यायकारक असून तो मागे घ्यावा या मागणीसाठी आज मंगळवार ता 8 डिसेंबर रोजी भारत बंदचा इशारा दिला होता , या बंदला रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभागाच्या संघटनेने जाहीर पाठींबा देत रिक्षा बंद करण्याचे आवाहन अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी आवाहन केले होते , दरम्यान आज सकाळ पासून कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा आणि टॅक्सीच्या रांगा लागल्या होत्या .नागरिकांची वर्दळ ही सुरू होती मात्र जसे अकरा वाजले तसे रिक्षा टॅक्सी महा संघाचा एका पदाधिकारी खाकी पँट आणि सफेद शर्ट घातलेला आणि पोलिसांप्रमाणे हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना हुसकावून लावत होता , जसा तो येत होता तसे रिक्षा चालक पळ काढत होते .यामुळे कल्याण रेल्वे स्थानक मध्ये मेल गाडीने गावावरून आलेल्या प्रवाश्यांचे चांगलेच हाल झाले .कुटुंबातील सदस्या समवेत रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले .तर याचा फायदा घेत काही रिक्षा चालकांनी त्या प्रवासी कडून वाढीव भाडे घेत प्रवाश्यांची लूट केली .

केडीएमटी आणि एसटीचा दिलासा ...

भारत बंद दरम्यान केडीएमटी आणि एसटी बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू होत्या .सकाळ पासून केडीएमटी आणि एसटी डेपो मधून बसेस सुरू राहिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला तर सकाळी 11 नंतर एसटी डेपो मध्ये प्रवासी संख्या कमी झाल्याचे चित्र होते .
 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.