कोडीं फुटणार! पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा रेल्वे मार्गाचे लोकार्पण

यामुळे उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे.
लोकल ट्रेन
लोकल ट्रेन File photo
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (PM Modi Inaugurate Thane-Diva Lines)

ठाणे आणि दिवा (Mumbai Local) यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून, यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येणार आहेत.

लोकल ट्रेन
पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण

कल्याण (Kalyan Station) हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन असून, देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्र येते आणि येथून पुढे या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) रवाना होतात. कल्याण आणि सीएसटीएम दरम्यान चार ट्रॅकपैकी दोन ट्रॅक हे धीम्या लोकलसाठी तर दोन ट्रॅक जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि माल गाड्यांसाठी वापरले जातात. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.